Breaking News

राजकारण

शिवसेनेच्या दलित माजी आमदाराला जातीवाचक शिव्या देत मारहाण १० दिवसानंतर अॅट्रोसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल

सातारा-मुंबई: राजू झनके राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. आतापर्यत गरिब दलितांवर अत्याचार होत होते. आता चक्क शिवसेनेचे धारावीचे माजी आमदार आणि चर्मकार समाजाचे नेते बाबुराव माने यांना त्यांच्याच गावात जातीवाचक शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली. मात्र या प्रकरणात तब्बल १० …

Read More »

कोरोनामुळे परिक्षा नाहीच, मात्र ऐच्छिकचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठांना सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक परिक्षा द्यायची त्यासाठीच्या परिक्षेचे नियोजन जिल्हाधिकारी आणि स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणाशी बोलून घ्यावा …

Read More »

ग्राहकांनो वीजबिले चेकने नव्हे तर ऑनलाईन पध्दतीने भरा महावितरणचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘तब्येत ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही’ प्रकृतीसंदर्भात काही बातम्या निराधार

मुंबई: प्रतिनिधी आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले. ‘आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिति पाहून …

Read More »

मराठा आरक्षण: विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात बाजू मांडणार राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे यासाठी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या बाजू मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्यावतीने तयारी करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी वकिलांची फौज अधिक बळकट करण्यात आली …

Read More »

धार्मिकस्थळे, देवस्थाने उघडण्याची काँग्रेसची मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरजित सिंह मनहास यांनी लिहिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक हे मानसिकरित्या खचत चालले आहेत. तर अनेकजण निराशावादी बनत चालले असल्याने नागरिकांना मुंबईतील देवस्थाने आणि धार्मिकस्थळे उघडावीत अशी मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.अमरजित मनहास यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. देशातील पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांमध्ये नागरिकांमध्ये जगण्याची …

Read More »

कॉपी बहाद्दर सरकारकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे भाजपा नेते अँड आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्य सरकारने फक्त अंतिम वर्ष परिक्षांचा “घोळ घालून दाखवला “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य धोक्यात आणले. उलट विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी युजीसीनेच केली. सरकारने ना युजीसीचे सर्क्युलर नीट वाचले, ना कसला अभ्यास केला, ना परिणामांचा विचार केला केवळ युवराजांचा हट्ट पुरवला. सगळा कॉपी पेस्ट कारभार सुरू असल्याची टीका …

Read More »

धनगर समाजासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गृहनिर्माण योजना बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

चंद्रपूर : प्रतिनिधी भटक्या ‘क’ जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण विकास, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून …

Read More »

पेन्शन लागू नसलेल्या Z.P कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसांना १० लाखाचे अनुदान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा त्याची सेवा १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास मदत व्हावी यासाठी त्यांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील पेन्शन लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन …

Read More »

पुण्यात प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षणासह तपासण्या वाढविण्याचे अजित पवारांचे आदेश

पुणे: प्रतिनिधी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी, पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल असा …

Read More »