Breaking News

राजकारण

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तज्ञांची समिती: जानेवारीपासून नवे शैक्षणिक वर्ष ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीत जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षण …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग ३ऱ्या वर्षी १७ पुरस्कारासह सर्वाधिक बक्षिसांचा मान राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये राज्याची घोडदौड कायम-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली-मुंबई : प्रतिनिधी नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाश शिंदे यांनी आज येथे केले. नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास …

Read More »

मंत्री राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात दलित सरपंचाच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी गेले असता कारवाई

आझमगड-मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत …

Read More »

प्रशिक्षण झालेल्या त्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून निवड केली होती. त्यांचे …

Read More »

शरद पवार म्हणाले, डॉ. दाभोळकरांच्या तपासासारखे राजपूतच्या केसमध्ये होवू नये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पवारांचा सीबीआयला टोला

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत राज्य सरकारकडून करण्यात येवून सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत दुसऱ्याबाजूला मात्र सीबीआयच्या निष्पक्ष कामाच्याबाबत अप्रत्यक्षरित्या प्रश्न उपस्थित करत अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येच्या तपासाबाबत जे झाले तसे अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या …

Read More »

व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे आदेश रत्नागिरी आणि लातूरात प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था लवकरच - उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी सध्याची कोरोनाची स्थिती पाहता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करावे आशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या. आज राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व उर्वरीत सर्व भारतीय सेवापूर्व …

Read More »

मुंबई पोलिसांवर दोषारोप न ठेवता न्यायालयाने तपास सीबीआयला दिला सीबीआयला सहकार्य करणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या तपासावरून सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अखेर शेवट झाला. न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर कोणताही दोषारोप न ठेवता मुंबई पोलिसांकडे असलेला हा तपास राजपूतच्या कुटुंबिय आणि बिहार सरकारच्या मागणीनुसार सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय दिला. हा तपास …

Read More »

उद्यापासून एसटीने जिल्ह्याबाहेर जाता येणार : ई-पासची गरज नाही परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या २० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब …

Read More »

सुशांतसिंग राजपूतप्रकरण : पार्थची मागणी पवारांचे संकेत आणि तपास सीबीआयकडे शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांच्या भेटीमागचे इंगित

मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी केली. ही मागणी जरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगेच फेटाळून लावली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद …

Read More »

ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय: आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करमाफी मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी …

Read More »