Breaking News

राजकारण

मुंबई पोलिसांनी जी लपवाछपवी केली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर या निर्णयाचे स्वागत करीत भाजपा नेते आमदार. अँड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारने आतापर्यंत या प्रकरणात लपवाछपवी केली होती आता तरी सीबीआयला सहकार्य करा, अन्यथा जनप्रक्षोभाला समोरे जावे लागेल, असा इशारा राज्य सरकारला दिला. भाजप …

Read More »

औरंगाबादच्या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीत राष्ट्रध्वजाचा अपमान गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : प्रतिनिधी देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा झेंड्याला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करताना हा ध्वज त्या त्या भागात सर्वोच्चस्थानी फडकवावा अशी राज्यघटनेतच नियम आहे. मात्र   १५ ऑगस्ट२०२० रोजी येथील समर्थनगरातील “प्रल्हाद भवन”  या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीतवर सर्वात उंचीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज, तर …

Read More »

देशाचा मृत्यूदर १.९२ टक्के, तर मुंबईचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये ५.४० टक्के मुंबईत संसर्गाचे प्रमाणही १९.७२ टक्के, चाचण्या वाढविण्याची विरोधी पक्षनेते फडणवीसांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पाठविले. सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले …

Read More »

मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनांना आता विमा संरक्षण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री अशोक चव्हाणांवर सोपविली ही जबाबदारी मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबत तोडगा चव्हाण काढणार

मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात …

Read More »

मंदिरे उघडा, वारकरी सांप्रदयाच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी पंढरपुरातील आंदोलनात सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, भजन कीर्तन करायला परवानगी दिली जावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला असून, ते स्वतः ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आयोजित आंदोलनाला पाठिंबा म्हणून सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदयातील साधु-संत त्याचप्रमाणे मठातील महाराज हे …

Read More »

आढावा बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत, त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत …

Read More »

पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी …

Read More »

शिक्षकांना दिलासा: कोविड कामातून मुक्त तर सरप्लस शिक्षकांना शाळेत बोलविणार शालेय शिक्षण विभागांचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड प्रसार रोखण्यासाठीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्या कामातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देत सरप्लस अर्थात अतिरिक्त शिक्षकाना त्यांच्या जवळच्या किंवा मूळ शाळांमध्ये बोलावून ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचा उपयोग करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने आज राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी राज्यात १ हजार ९२० जागांवर मिळणार प्रवेश-अल्पसंख्याक मंत्री मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनामध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले. राज्यात …

Read More »