Breaking News

राजकारण

शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार युनुसभाई शेख यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी निधन

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील राजकारणात काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस असो मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे. सोलापूर महापालिकेत पहिल्यांदा १९६९ साली नगरसेवक म्हणून …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या केल्या..वाचा मदतीच्या निकषांमध्ये बदल, मासेमारांसह शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या!

मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेत कोकण दौर्‍याच्या अनुषंगाने तेथील अडचणींच्या १९ मागण्यांचे एक निवेदन त्यांना सादर केले. देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस कोकणाचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणांना भेटी देऊन नुकसानीचा …

Read More »

पहिला रूग्ण सापडण्याआधीच पंतप्रधानांना कोरोना संकट माहित होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडण्याआधी या संसर्गजन्य आजाराची आणि यामुळे निर्माण होत असलेल्या संकटाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मादी यांना होती असा गौप्यस्फोट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. जावडेकर हे ११ जून रोजी सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमध्ये ऑनलाईन जनसंवाद रॅलीला संबोधित करत होते. तसेच या …

Read More »

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट द्या वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

पुणे: प्रतिनिधी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता त्यांना अग्नी द्यायचा असतो, मात्र अग्नी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांना संरक्षण साधन (पीपीई किट) नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

Read More »

बन्सोड हत्याप्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करावा आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न असल्याचा माजी मंत्री बडोले यांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी राजकीय दबावामुळे जलालखेडा पोलिसांनीआरोपींच्या विरोधात अँट्रासिटीतंर्गत गुन्हा नोंदविण्यास विलंब करत आरोपींना पळून जाण्यास मदत केली. या आरोपी व ठाणेदाराने संगनमताने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाणेदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी करत सदर प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी …

Read More »

एसआरए प्रकल्पांबाबत डॉ.जितेंद्र आव्हाडांचा आणखी एक नवा निर्णय प्रत्येक प्रकल्पात १ ते ५ हजार चौरस फुटाचे आरोग्यकेंद्र उभारणार

ठाणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भविष्यात वैद्यकीय सुविधांची वानवा भासू नये, यासाठी एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये १ हजार ते ५ हजार चौरस फुटाचे आरोय केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. म्हाडा, एसआरए योजनांच्या वास्तूंमध्ये …

Read More »

तांदळाचे ९ वाण शोधणारे स्व. दादाजी खोब्रागडे यांचा मरणोत्तर पद्म पुरस्कार द्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी सुप्रसिद्ध कृषी संशोधक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करून तांदळाचे नवीन नऊ …

Read More »

फडणवीस म्हणाले, सरकारने पॅकेज जाहीर केले पण त्याचा फायदा नाही कोकणातील परिस्थितीबाबत सर्वंकष निवेदन सरकारला देणार

दापोली: प्रतिनिधी आज सरकारचे अस्तित्त्व जमिनीवर दिसत नाही. केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. कुठलीही आपत्ती आपण थांबवू शकत नसलो तरी पण, त्याला प्रतिसाद कसा दिला, हे महत्त्वाचे असते. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले. पण, त्याचा फायदा होणार नाही. मासेमारांसाठी त्यात काहीही नाही. मी अनेक कोळीवाड्यांना भेटी दिल्या. डिझेलचा परतावा …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या अख्यारितील विभागाच्या कर्मचाऱ्यांना मे चे वेतनच नाही ५५ लाख रूपयांची माहिती न दिल्याने वित्त विभागाने पगार थांबविला

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे या भलेही राज्य सरकारच्या तिजोरीत कडखडाट होत आलेला असला तरी सरकारने कर्ज काढून शासकिय कर्मचाऱ्यांना कर्ज काढून पगार दिले. मात्र राज्याचे मुख्यमंत्री असलेले उध्दव ठाकरे यांच्या अखत्यारीतील जनसंपर्क विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जूनची १५ तारीख उजडत आली तरी त्यांना मे महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नसल्याची …

Read More »

केंब्रीज, ऑक्सफर्डपेक्षा जास्त शहाणे आहेत का माहिती नाही पण, राज्यापालांकडे खरे ज्ञान राज्यपालांच्या मदतीला भाजपा नेते

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल केंब्रीज विध्यापिठापेक्षा जास्त शहाणे आहेत कि नाहीत माहित नाही पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ऑक्सफर्ड आणि केंब्रीजचं खरं ज्ञान असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगत शरद पवार यांनी केलेल्या टिपण्णीला प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काल रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील …

Read More »