Breaking News

राजकारण

नारायण राणेंचा अजित पवारांना बारा वाजविण्याचा इशारा देत ठाकरेंच्या खोक्याची कॅसेट माझ्याकडे कसबा निवडणूकीवरून राणेंचा अजित पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी करत, ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर …

Read More »

अशोक चव्हाण यांची टीका, केंद्राच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे न्यायमुर्तीही सुरक्षित राहिले नाहीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजपावर जोरदार टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढतो आहे. न्यायमुर्ती सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत. न्यायालये ही न्यायाची शेवटची आशा असते. उद्या तिथेही न्याय मिळणार नसेल तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे? असा परखड सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय प्रस्तावासंदर्भात मते मांडताना …

Read More »

पैसे वाटपाचा आरोप करणाऱ्या धंगेकरांच्या विरोधात भाजपाने केली उमेदवारी रद्दची मागणी पुरावे होते तर सरळ पोलिसांमध्ये तक्रार करायची केवळ प्रचार करण्यासाठीच हा स्टंट-भाजपाचा दावा

कसबा आणि चिंचवड मतदारसंघात उद्या (२६ फेब्रुवारी) पोटनिवडणूक पार पडणार आहे. या दोन्ही मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाची अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपाने पोलिसांना हाताशी घेऊन कसब्यात पैसे वाटप …

Read More »

धंगेकरांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, भाजपाच्या काळात पोलिसांच्या व्हॅनमधून पैशांची… रविंद्र धंगेकर यांच्या आरोपावर विश्वास ठेवावा लागले

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. आचारसंहित लागल्यानंतर प्रचार थांबला, मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, भाजपा सरकारच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ कांद्यावरील निर्यातबंदी उठवा व १५०० रुपये हमी भाव द्या

भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला १५०० रुपये हमी …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत जर… शिवसेना संपविल्याचा आनंद अमित शाह यांच्या चेहऱ्यावर दिसतोय

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय भविष्य यावर मोठं विधान केलं आहे. मुस्लीम समुदायाने साथ दिली, तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते मुंबईत मुस्लीम मौलवी आणि उलमा …

Read More »

अजित दादांच्या त्या टीकेवर गुलाबराव पाटील यांचा पलटवार, सकाळी शपथ तर संध्याकाळी कोणा… शेवटी जनता हुशार

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली असून या निवडणूकीचा प्रचार संपताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांबाबत भविष्यवाणी करत …

Read More »

काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधींनी ‘प्रवासाचा समारोप’ असे सांगत दिले निवृत्तीचे संकेत भाजपा-आएसएसने सगळ्या संस्था नेस्तानाभूत केल्या

छत्तीसगडमधील रायपूर येथे दोन दिवसांपासून काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. काँग्रेसचे जवळपास १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गांधी कुटुंबियातील कोणीच हजर राहिले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवरून अजित पवारांची टीका, पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणूकीत फिराव लागतंय.. कसबा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा रोड शो

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा- शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबतचे केंद्राचे पत्र केले जाहिर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव होणार

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर होणार आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्याचे मूळ नाव कायम राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला …

Read More »