Breaking News

धंगेकरांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, भाजपाच्या काळात पोलिसांच्या व्हॅनमधून पैशांची… रविंद्र धंगेकर यांच्या आरोपावर विश्वास ठेवावा लागले

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. आचारसंहित लागल्यानंतर प्रचार थांबला, मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी २५ फेब्रुवारी मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात मागील मोठा काळ पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटप करण्याचा ‘फॉर्म्युला’ तयार करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत बारामती-पुणे भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटप होत होतं हे पुराव्यासह उघड झालं. पोलीसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात हे अनेकदा पुराव्यांसह उघड झालं आहे.

पैसे वाटण्याचं काम पोलिसांच्या गाड्यांमधून सुरक्षितपणे होऊ शकतं. त्यामुळे कसब्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण याआधी भाजपाच्या कालखंडात पोलिसांच्या गाडीतून पैशांची आवक-जावक, वाटप झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले.

फडणवीसांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो.

महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर, घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होते, तेव्हा अशावेळी विरोधी पक्ष किंवा सरकार बनवू इच्छिता त्यांच्याशी बोलले असतील, बोलले होते. ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि किती काळ या पदावर राहतील हे सांगता येत नाही. हे सर्व दिल्लीच्या मर्जीप्रमाणे आहे. फडणवीसांनी या सनसनाटीचा आनंद घ्यावा, असंही राऊतांनी नमूद केले.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *