Breaking News

मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असून आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ,खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते आमदार रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विजयसिंह मोहिते पाटील,माजी मंत्री गणेश नाईक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

आज राष्ट्रवादीची संसदीय समितीची बैठक पार पडली महाराष्ट्रातले संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा झाली आहे. आणखी काही इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार आहोत. येत्या चार- पाच दिवसात अंतिम उमेदवारांची यादी तयार करू. देशात सर्वच स्तरातून विद्यमान भाजप सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे आमची आघाडी राज्यात ३५ जागा जिंकेलच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पवारसाहेबांनी माढामध्ये निवडणुक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होईल. मनसे सध्या मोदींच्या विरोधात आहे, त्यामुळे ते आम्हाला सहकार्य करतील अशी आशा आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याचा आमचा विचार आहे. पण राजकारणात एका हाताने टाळी वाजत नाही, आम्ही अजूनही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

समविचारी पक्षांना घेवूनच लोकसभा निवडणूक लढविणार – जयंत पाटील

लोकसभेत समविचारी पक्षांना एकत्र घेवूनच काम केले जाणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.

माढामधून साहेबांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका सर्वच नेत्यांनी घेतली. पवार साहेबांनी याबाबतचा निर्णय घेतला नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांनीच साहेबांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका मांडली. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. वंचित आघाडीला चार जागा देण्याचे ठरवले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांनी एकत्र यावे असे वाटते. संविधानाला जे विरोध करत आहेत त्या भाजपविरोधात प्रकाश आंबेडकर नक्की येतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

राहुल गांधी यांचा थेट सवाल, मोदीजी घाबरलात का?

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यातच पुन्हा एकदा भाजपा आणि नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *