Breaking News

६ जागांपैकी ३ जागा देणार असेल तरच राष्ट्रवादीशी आघाडी लातूरची जागा न देण्याबाबत काँग्रेस ठाम

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी संस्था अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण आलेले ६ सदस्य निवृत्त होत आहेत. या निवृ्त्त सदस्यांमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. मात्र या निवडणूकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातील रिक्त होणाऱ्या तीन जागांबरोबरच चवथी जागा काँग्रेसकडे मागितली आहे. परंतु गतवेळेनुसार याही निवडणूकीत रिक्त जागांचे समसमान वाटप होणार असेल तरच राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली या मतदारसंकडून घातून भाजपचे मितेश भांगडीया, परभणी-हिंगोली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी, काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातून), राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक मतदारसंघातून ), भाजपचे उद्योग राज्यमंत्री  प्रवीण पोटे (अमरावती मतदारसंघातून) आदी सदस्य निवृत्त होत आहेत. या सहा सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य तर काँग्रेसचा एक आणि भाजपचे दोन सदस्य निवृत्त हरोत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदम तीन सदस्य निवृत्त होत असल्याने त्यांच्याकडील विरोधी पक्षनेते पदही हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती रहावे यासाठी राष्ट्रवादीच्या ताब्यातील तीन जागांसह काँग्रेसच्या ताब्यातील आणखी एक जागाही राष्ट्रवादीकडून मागण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्तविक पाहता लातूर नगरपालिकेत जरी राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असले तरी इतर स्थानिक संस्था अर्थात पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, उस्मानाबाद जिल्हातील स्थानिक स्वराज्य संस्था या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार सहज निवडूण येवू शकतो. त्यामुळे ही जागा काँग्रेस सोडण्यास इच्छुक नाही. याशिवाय परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे या निवडणूकीत काँग्रेसकडून ही जागा लढविण्याची तयारी सुरु केली आहे. याशिवाय अमरावतीमधील महापालिकेची सत्ता भाजपकडे असली तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने यावेळी भाजपकडून ही जागा खेचून घेण्यात काँग्रेसला यश मिळणार असल्याचा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

या परिस्थितीच्या आधारे काँग्रेसकडून तीन जागा लढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जर तीन तीन जागांवर तडजोड करण्यास तयार असेल तरच राष्ट्रवादीषी आघाडी होवू शकते. अन्यथा काँग्रेस स्वबळावर या तीन्ही ठिकाणी उमेदवार उभे करून स्वबळावर निवडूण आणणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या अनुषंगाने १ मे नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यान बैठक होवून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *