Breaking News

अखेर भाजपमध्ये उपेक्षित असलेल्या माधव भांडारी यांना मिळाला मंत्री पदाचा दर्जा महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता भारतीय जनता पार्टीचे इमाने इतबारे काम करणाऱ्या पक्षाचे प्रवक्त माधव भांडारी यांना दोन वेळा आमदारकीची हुलकावणी मिळाल्यानंतर अखेर मंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदी माधव भांडारी नियुक्तीही करण्यात आली असून मंत्री म्हणून मिळणारे सर्व सरकारी फायदे त्यांना मिळणार असून यासंदर्भात राज्य सरकारने अधिकृतरित्या शासन निर्णयही जाहीर केला आहे.

माधव भांडारी हे गेली अनेक वर्षे भाजपच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच ते राज्यात ज्या ज्या वेळी सरकार आणि भाजपसाठी अडचणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी ट्रबल शुटर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. याशिवाय दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाचे तार्किक पध्दतीने भूमिका मांडत पक्षाचे डँमेज कंट्रोल रोखण्याचे कामही चांगल्या पध्दतीने करत आहेत.

त्यामुळे त्यांना भाजपकडून दोनवेळा विधान परिषदेवर आमदारी देण्याचा विचार सुरु होता. मात्र त्या दोन्ही वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधव भांडारी यांच्याऐवजी पक्षात आलेल्या आयारामांना संधी देत त्यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे त्यांची पक्षात निष्ठावंत असूनही उपेक्षाच होत असल्याबाबत खंत व्यक्त करण्यात येत होती.

अखेर राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन व पुर्नस्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्ष पदी माधव भांडारी यांची नियुक्ती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच या पदाला मंत्री पदाचा दर्जा देत त्यांना सर्व सरकारी सोयी-सुविधाही देण्याचे जाहीर केले.

त्यामुळे अखेर माधव भांडारी यांना आमदार म्हणून थेट विधिमंडळात प्रवेश मिळालेला नसला तरी त्यांना मंत्री म्हणून दर्जा मिळाल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *