Breaking News

सर्वाधिक जागा आणि मते भाजपाला तर दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त अर्थात १ कोटी ४२ लाख मते भाजपाला मिळाली आहेत. तर सर्वात जास्त १०५ आमदार निवडूण आले असून १४ अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याने ११९ आमदारांच्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होवू शकत नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात भाजपानंतर सर्वात जास्त मते राष्ट्रवादीला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
तीन दिवसीय भाजपाच्या चिंतन बैठकीनंतर ते बोलत होते.
भाजपानंतर सर्वाधिक मते राष्ट्रवादी काँग्रेसला ९२ लाख मिळाली असल्याने राष्ट्रवादी मतांच्या आकडेवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर शिवसेनेला ९० लाख मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय सर्वात जास्त १२ महिला आमदार भाजपाच्या निवडूण आल्या आहेत. अनुसूचित जातीच्या ९ आणि जमातीच्या ३ ठिकाणी भाजपाच्या महिला आमदार निवडूण आल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवघ्या ३ आमदार निवडूण आल्या. १९९० पासून कोणताही राजकिय पक्ष निवडणूकीत १०० चा आकडा गाठू शकला नाही. फक्त भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये शंबरी पार करणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. तसेच आमच्याकडे आणखी दोन महिन्याचा कालावधी असून या कालावधीत भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याची माहिती त्या त्या भागातील आमदारांनी घ्यावी असे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे आता २३ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले असून हे नुकसान जास्त आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रश्नी शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून केली.
राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी आंदोलन करणार-भाजपा
राफेल भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वाचा आहे. याप्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्यायालयाची माफी मागितली होती. आता न्यायालयाचा अंतिम निकाल आल्याने राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी करत संपूर्ण देशभरात यासाठी एक दिवसीय आंदोलन भाजपाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *