Breaking News

अब्दुल सत्तार ते वाय प्लस सुरक्षेवरून अजित पवार यांनी काढले सत्ताधाऱ्यांचे वाभाडे

यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली महाराष्ट्राची परंपरा घडी विस्कटवू नका तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पहात असतात, लक्षात ठेवत असतात, काहीजण सहज बोललो म्हणत आहेत. तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही. तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे. तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना खडसावले.

आज जनता दरबार उपक्रमास आले असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहिण सुप्रिया हिला काही बोलले… विनाशकाले विपरीत बुद्धी… हेच त्यांना बोलले पाहिजे… काय आपण बोलतोय… मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का… मंत्री पदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत संविधान… कायदा… नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो पण यामध्ये हे चुकत आहेत असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबाराची घटना बैलगाडी शर्यतीत घडली… बैलगाडी शर्यतीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडतेय… सरकार काय करतंय?… ठाण्यात किसननगर भागात शिंदे – ठाकरे गटात राडा झाला अशी राडेबाजी करुन चालणार नाही…पोलिसांना बाकीच्यापेक्षा याच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. हे काय चालेल आहे असा सवालही त्यांनी सरकारला केला.

किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे असे सांगतानाच त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? … काहींचा तर ३० – ३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री होतो जास्त गाड्या असल्या की नको सांगत होतो. हा पैसा तुमचा नाहीय… सरकारकडे टॅक्स रुपाने आलेला आहे. ज्या आमदाराला कुठल्याही पक्षाचा असो बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे त्यांचे व नागरीकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना? … काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण… कोण त्याला काय करतंय… तो माजी झाला ना… त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल… त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता असा संतप्त सवालही त्यांनी केला.

माझा पाच दिवसाचा परदेशातील कार्यक्रम फार पूर्वी ठरला होता तो रद्द करता आला नाही. शिर्डीतील शिबीराला एक दिवस उपस्थित राहून गेलो. मात्र एवढया दिवसात मी प्रेस समोर आलो नाही तर अजित पवार कुठे गेले आहेत. अजित पवार उपलब्ध नाहीत. अजित पवार नाराज… फारच प्रेम आमच्यावर ऊतू जातं.. अशा काही बातम्या येत होत्या. जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो. राजकारणात असल्यामुळे लोकांमध्ये काम करत असताना अशा गोष्टी लपवून ठेवणे चालत नसते. मात्र चार – पाच दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यावेळी मी इथे नव्हतोच. त्यामुळे स्टेटमेंट आले नाही असा खुलासा रोज येणाऱ्या बातम्यावर अजित पवार यांनी केला.

यावेळी अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेता म्हणून नागरीक म्हणून सरकार आल्यापासून कसं काम सुरू आहे सरकार कसं आलं या खोलात जात नाही. ४० आमदार कसे फुटले आणि पुढच्या घडामोडी आता ते प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यावेळेपासून प्रशासन पाहिजे असे काम करताना दिसत नाही. सुरुवातीला बराच काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांवर राज्याचा लोढ होता. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार केला १८ लोकांचा समावेश केला. २० लोकांचे मंत्रीमंडळ आहे. त्यावेळी किती लोकांनी चार्ज घेतला. काहीजण आपल्या मिळालेल्या खात्यावर नाराज आहेत. मी अनेक वर्षाच्या म्हणजे ३२ वर्षाच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यावर, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे . बैठका कशा घेत होतो. वेळेवर बैठका होत होत्या. बैठका रद्द होत नव्हत्या अधिकाऱ्यांना ताटकळत बसावे लागत नव्हते. परंतु आता तसं अजिबात होत नाही. पोलीसांचे चांगले प्रशासन म्हणून जगभर ओळख आहे. परंतु या सरकारच्या काळात राज्यात पोलीस तणावाखाली काम करत असा आरोपही केला.

Check Also

काँग्रेसचे मराठवाड्यात येत असलेल्या पंतप्रधान मोदी यांना प्रश्न

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील सहभागी राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *