Breaking News

उध्दव ठाकरेंच्या खोचक टोल्यावर खासदार नवनीत राणा म्हणाल्या, ती वेळ लवकरच येईल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना डिवचले

नुकत्याच झालेल्या शिवसंपर्क अभियानातंर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित जाहिर सभेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मध्यंतरी कोणी तरी घरासमोर येवून हनुमान चालिसा म्हणणार होते. पण आमच्या रणरागिणींच्या आवेश पाहून ते पळून गेल्याची खोचक टीका करत परवा जम्मू मध्ये सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट या काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली. मग काय त्या सरकारी कार्यालयामोर आणि दहशतवाद्यांसमोर जावून हनुमान चालिसा म्हणणार का? असा खोचक टोला राणा दाम्पत्याचे नाव न घेता लगावला.

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या या खोचल टोल्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. कोणताही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्याचे दुःख काय असते हे त्यांना विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तेव्हा मी विचारणार तुम्हाला कसे वाटते असे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी काल गदा हातात न घेता त्याला करंट लागत असल्यासारखे वर्तन केले. उद्धव ठाकरेंनी गदेचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचं त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंतर तिप्पट प्रमाणात राज्यात बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.

औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

“मला म्हणाले हनुमान चालिसा काश्मीरमध्ये जाऊन म्हणा. जर मी काश्मिरमध्ये हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? मी नवनीत राणा, रवी राणाच्या फायद्यासाठी हनुमान चालिसा म्हणणार नव्हते. तुम्ही पुरुष आहात, माझ्यापेक्षा महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली आहात. पण तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर केलात. हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी करणाऱ्या महिलेला तुम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकता. पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. शिवसेना औरंगजेबाची सेना झाली आहे का? असा खोचक सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेमके काय म्हणाले…

भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी, सध्या जे काही राज्यात सुरु आहे ते सगळे भाजपाची ए, बी, सी टीम आहेत. एकाच्या हातात भोंगा द्यायचा, दुसऱ्याच्या हातात हनुमान चालिसा द्यायची आणि तिसऱ्याला टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घ्यायला लावायची. आणि स्वत: मात्र लांब बसून मजा बघायची आणि गुन्हे दाखल झाले तर यांच्यावर होणार आणि हे काय मजा बघत बसणार. अरे लढायचे तर थेट लढा असे आव्हान दिले.

तसेच ज्यांना सुरक्षेची गरज आहे त्या काश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यायची नाही आणि ज्यांना सुरक्षेची गरज नाही अशांना सुरक्षा पुरवायची. आणि त्यांच्यावर हल्ला झाला म्हणून आम्हाला पत्र पाठवून विचारतायत की हल्ला कसा झाला. सुरक्षा यंत्रणा तुमची आहे त्यांना तुम्हीच विचारा ना अशी खोचक टीपण्णीही त्यांनी केली.

Check Also

Supreme Court चा बॅलट पेपरला नकार मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसाठी दिले हे आदेश

देशात लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत देशात चार टप्प्यात किंवा फार तर दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *