Breaking News

शुभ बोल रे “ डॉ.आशिष ” सरकारचे आमदार डॉ. देशमुखांना साकडे

नागपूर : प्रतिनिधी

स्वंतत्र विदर्भाच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करणाऱे भाजपचे विदर्भातील आमदार डॉ. आशिष देशमुख यांना सरकारकडून विरोधकांच्या प्रस्तावावर बोलण्यास सांगितले. मात्र सरकारच्या विरोधात बोलण्याऐवजी बाजूने बोलण्यास सांगितल्याची माहिती विधानसभेत भाजप आमदार डॉ.आशिष देशमुख यांनीच सांगितल्याने भाजपला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा विधानसभेत सुरु झाली.

विदर्भाच्या प्रश्नासह ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प, मँग्नेटीक महाराष्ट्र, मेक इन इंडिया सारख्या मोठ्या गुंतवणूक समेटमधून विदर्भात गुंतवणूक आली नसल्याचा प्रश्नी डॉ. देशमुख हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवितात. त्यामुळे सत्ताधारी अर्थात भाजपकडून सातत्याने त्यांना डावलण्यात येते. तसेच विधानसभेत सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल अथवा विरोधकांचा प्रस्ताव असेल त्यावर बोलण्याची संधी दिली जात नाही. मात्र या पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच विरोधकांनी मांडलेल्या २९३ अन्वये खालील प्रस्तावावर पक्षाची भूमिका मांडण्याची संधी दिली. परंतु संधी देताना सरकारबद्दल शुभ अर्थात सकारात्मक बोलण्याची सूचना सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी सांगितल्याचे डॉ.देशमुख यांनीच सभागृहात सांगितले.

तरीही डॉ.देशमुख यांनी सरकारच्या कारभारावर टीका करत ईज ऑफ डूईंग बिझनेसमध्ये मागे पडल्याचे सांगत कटोल मतदारसंघात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. परंतु सरकारला सांगूनही त्याची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात बोंडअळी दिसली पण सरकारच्या कागदावर बोंडअळी दिसली नसल्याचा आरोप राज्य सरकारवर केला. आमच्या भागाचा समावेश बोंडअळीग्रस्ताच्या यादीत न केल्यास टोकाची भूमिका घेईल असा इशारा त्यांनी दिला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *