Breaking News

कोविडमुळे पालक मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर पर्यंतचे शुल्क माफ विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ-मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पुर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे वसतीगृहाचा उपयोग करण्‍यात येत नसल्याने वसतीगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येणार आहे. तसेच विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही. परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोविडमुळे मयत झालेल्या पालकांच्या मुलांना शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आणि एकप्रकारे मदतीचा हात राज्य सरकारकडून देण्यात आला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *