Breaking News

राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारीपासून

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या प्रगतीची दिशा दाखविणाऱ्या अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या ९ तारखेला विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिली.

विधिमंडळाच्या सांसदीय सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारी रोजी सुरु झाल्यानंतर २८ मार्च रोजी पर्यंत सुरु राहणार असून जवळपास १ महिना हे अधिवेशन चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पिय अधिवेशन होत असून जीएसटी कराची अंमलबजावणी सुरु होवून ८ महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे या करप्रणालीमुळे राज्याच्या तिजोरीत किती निधी जमा झाला ? याची माहिती राज्याच्या जनतेला कळणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध होणार याचीही माहिती उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर यंदाच्या अधिवेशनात शेतकरी धर्मा पाटील यांचे आत्महत्येचे प्रकरण आणि मंत्रालयात येवून जनतेकडून करण्यात येत असलेली आंदोलने यापार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पिय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *