Breaking News

गान कोकिळेंच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार होणार

मराठी ई-बातम्या टीम

आपल्या सुरेल आवाजाने समस्त भारतीय सिने रसिकांबरोबर संगीत प्रेमींना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत ४.३० वाजता येणार आहेत. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवाजी पार्क परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचे जिव्हाळ्याचे नातं होते. तसेच त्या त्यांना भाऊ मानत होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहत त्यांच्याबरोबर झालेल्या भेटी, चर्चा आदीं कायम स्मरणात राहतील असे सांगत त्यांच्याबरोबर असलेले फोटोही त्यांनी ट्विट केले.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *