Breaking News

अखेर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल तलवार चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदेश जारी

अंधेरी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात व्हाया केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत पोहोचला. त्यावर निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने या वादावर अंतरिम आदेश देत उध्दव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्यास परवानगी देत मशाल हे चिन्ह दिले. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मंजूर करत ढाल तलवार हे चिन्ह आयोगाने दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारपर्यंत चिन्ह आणि पक्षाचे नाव सादर करण्यास दोन्ही गटाला आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाकडून मशाल, उगवता सुर्य आणि त्रिशुळ हे तीन चिन्ह पाठवित शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे ही नावे पक्षासाठी सुचविली होते. यापैकी उध्दव ठाकरे यांना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव पक्ष म्हणून वापरण्यास परवानगी दिली. तर मशाल हे चिन्ह वापरण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली.

मात्र एकनाथ शिंदे गटाकडून गदा आणि उगवता सुर्य आणि त्रिशुळ अशी तीन चिन्ह सुचविण्यात आली. मात्र त्रिशुळ आणि गदा ही दोन चिन्हे निवडणूक आयोगाकडून रद्दबातल करण्यात आली. तसेच नव्याने चिन्हे आज मंगळवारी दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले.

त्यानुसार आज शिंदे गटाकडून उगवता सुर्य आणि ढाल तलवार ही दोन चिन्हे शिंदे गटाकडून आयोगाकडे पाठविण्यात आली. या दोन चिन्हापैकी शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मंजूर करत तशा सूचना सर्व निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.

दरम्यान ढाल तलवार हे चिन्ह पूर्वी बाळासाहेब ठाकरे हे जीवंत असताना त्यांनी १९८९ च्या आधी धनुष्यबाण चिन्ह मिळण्यापूर्वी शिवसेनेकडून निवडण्यात आले होते. या चिन्हावर शिवसेनेने काही निवडणूका लढविण्यात आल्या.

निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेले हेच ते आदेश

Check Also

सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *