Breaking News

मोदींना मातृशोक, अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधानांची लगेच कामाला सुरुवात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोलकत्त्यातील वंदे भारतला दाखविला हिरवा झेडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. मृत्यूसमयी हिराबेन मोदी या १०० वर्षाच्या होत्या.

पंतप्रधान मोदींना मातृशोक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अनेकांनी समाजमाध्यमांवरुन श्रद्धांजली अर्पण केली. सर्व पक्षीय नेते आणि मान्यवरांनी मोदींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. हिराबेन मोदींना श्रद्धांजली अर्पण करताना आम्ही या दु:खद प्रसंगी मोदींसोबत असल्याचं अगदी सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाल्याचे कळताच मोदी आज सकाळीच गांधीनगर येथील त्यांच्या घरी पोहचले होते. यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आईच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि खांदा अंत्यसंस्कार पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदींनी या दु:खात स्वत:ला सावरत तासाभरातच पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली.

हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला. आईच्या निधनामुळे मोदींनी पश्चिम बंगालचा दौरा पुढे ढकलला, मात्र त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकातामधील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ती देशाला समर्पित केली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडा दाखवत असताना आणि हावडा स्टेशनवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित असताना, जमलेल्या नागरिकांनी जय श्रीराम अशा घोषणाही दिल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधानावर शोक व्यक्त करताना म्हणाल्या, पंतप्रधान मोदीजी आज आपल्यासाठी अत्यंत दुख:द दिवस आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की हे दु:ख सहन करण्याची तुम्हाला शक्ती लाभो. मी आपणास विनंती करेन की हा कार्यक्रम आपण छोट्या स्वरुपातच करावा, कारण तुम्ही आता तुमच्या आईचे अंत्यसंस्कार करत आहात.

Check Also

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी दोन भारत निर्माण करतायत

पुणे येथील कल्याणी नगर भागात करोडपती विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने दारू पिऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *