Breaking News

न्याय न देणाऱ्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही

यवतमाळ : प्रतिनिधी

माझ्या राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला या भाजप-सेनेच्या सरकारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे आणि आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत व्यक्त केला.

 आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांची ७१ हजार कोटीची कर्जमाफी झाली. परंतु आत्ताचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख पे तारीख देत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू शकणार नाही कारण हे सरकारच कर्जबाजारी झाले आहे. खोटया जाहिराती देवून हे सरकार आपल्या करातून जमा होणाऱ्या पैशावर डल्ला मारताना दिसत आहे असा घाणाघाती आरोपही अजित पवार यांनी केला.

अजित पवार यांचे भाषण सुरु असतानाच वकील संघटनांनी सरकारच्याविरोधात हल्लाबोल करत जाहिर सभेच्याठिकाणी प्रवेश केला.त्यावेळी अजित पवार यांनी वकील संघटनांचे स्वागत केले. यावेळी मोठया संख्येने वकील सहभागी झाले होते. राज्यातील सरकारच्याविरोधात एवढया मोठयाप्रमाणात वकील संघटना उतरते त्याबद्दल अजित पवारांनी त्यांना धन्यवाद दिले.

 खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारने कर्जमाफी केलेल्या फसव्या आणि खोटया जाहिरातीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी बोंडअळीमुळे प्रार्दुभाव झालेल्या शेतकऱ्यांचे जी फॉर्म अदयाप सरकारने भरुन घेतलेले नाहीत. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने घातलेले नाही त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचा कारभार एकदम पारदर्शक आहे कारण तो पारदर्शक असल्यामुळेच दिसत नाही. मुख्यमंत्री सहा हजार कोटीची कर्जमाफीची रक्कम बॅंकांकडे दिल्याचे बोलत आहे. परंतु बॅंकवाले कर्जमाफीचे पैसेच बॅंकेमध्ये जमा झाले नसल्याचे सांगत आहेत. मग हे पैसे गेले कुठे. ते पारदर्शक झाले का ? अशी बोचरी टिकाही त्यांनी केली. र्त्या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपासून( १ डिसेंबर ) हल्लाबोल पदयात्रा सुरु केली असून ही पदयात्रा ११ डिसेंबरला नागपूरच्या विधानभवनावर धडकणार आहे.

या हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील,माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार हेमंत टकले, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींसह राज्यातील आजी-माजी खासदार, आमदार, युवक नेते, आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने या जाहीर सभेला उपस्थित होते.

Check Also

शरद पवार यांचा हल्लाबोल, एखाद्या हुकूमशहासारखं मोदींचा राज्यकारभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *