Breaking News

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासह या राज्यांना केली पेट्रोल-डिझेलवरून विनंती करात कपात करण्याची केली सूचना

मागील काही महिन्यापासून संपूर्ण देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या जाचक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडूसह सात राज्यांना वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करावी अशी विनंती केली.
तसेच कर कपातीवरून मी कोणावर टीका करत नाही तर विनंती करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि आरोग्य मंत्र्यांची व्हिडिओ काँन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडू, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांना विनंती करत करात कपात करण्याची विनंती केली. या बैठकीला देशभरात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
साधारणतः उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यातम केंद्र सरकारने पेट्रोलवरील करात १० रूपये तर डिझेलवरील करात ५ रूपयाने कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर त्या पाच राज्यांचे निकाल जाहीर झाल्याच्या दहा दिवसानंतर केंद्राने पुन्हा पेट्रोल, डिझेल आणि घरगुती व व्यावसायिक गँस दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली. त्यामुळे आजस्थितीला मुंबई पेट्रोल १२२ रूपये, डिझेल १०८ रूपये, घरगुती गँस एक हजार रूपये तर व्यावसायिक गँस २ हजार रूपये किंमतीवर पोहोचला. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंसह जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. यापार्श्वभूमीवर या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित विस्कटत चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे.
यापार्श्वभूमीवर आज कोविड निमित्ताने देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी वरील मुद्दा उपस्थित करत पेट्रोल-डिझेलवरील राज्य सरकारांच्या असलेल्या व्हॅट करात कपात करण्याची विनंती केली.
विषेष म्हणजे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या करात कपात केल्यानंतर भाजपाशासित राज्य सरकारांनी लगेच त्यांच्या करात कपात केली. मात्र भाजपेतर राज्य सरकारांनी कर कपात करण्यास नकार दिला.

Check Also

अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार

मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *