Breaking News

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपावर परिवहन मंत्र्यांचा कारवाईचा इशारा कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अल्प पगारवाढीच्या निषेधार्थ एस.टी.कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला. कर्मचाऱ्यांच्या या अघोषित संपामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने एस.टी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता बळावली आहे.

पहाटे ४:३० वाजता पहिली एसटी बस मुंबईहून रवाना, सर्व बसेस सुटल्या मुंबई सेंट्रल बस स्थानक पूर्णपणे सुरु आहे. मात्र काही ठिकाणी डेपो बंद करण्याचा प्रयत्न एस.टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी एसटी बसेसची वाहतूक अडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल स्थानके सुरळीत सुरु आहेत. काही ठिकाणी अडथळे निर्माण केले जात आहेत.

दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एसटीचा संप नाही. कोणी कल्पना न देतां कामावर कर्मचारी आले नाहीत. त्यांच्यावर प्रशासन हवे ती योग्य कारवाई करतील. ज्या कर्मचाऱ्यांना केलेली वेतनवाढ मान्य नसेल तर औद्यगिक न्यायालयात जायला हवे. कोणतीही कामगार संघटना नेते समोर न येतां कर्मचारीना अडचणीत आणतात. एसटी प्रशासन योग्य कारवाई बाबत भूमिका घेईल, मी कारवाई बाबत विचार कधीच  करत नाही, कर्मचाऱ्यांचे नुकसान नको ही भूमिका आहे.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *