Breaking News

सांस्कृतिक कार्य खात्यात “हौशे, नवशे, गवशे”ची परंपरा कायम..! पूर्ण वेळ "संचालक" शोधण्यास शासन हतबल

मुंबईः प्रतिनिधी
एक महिना पूर्ण होत आला तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा कारभार हाकण्यासाठी पूर्ण वेळ ” संचालक” सांस्कृतिक कार्य खात्याला मिळनासा झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संचालनालयामध्ये “हौशे, नवशे, गवसे”ची परंपरा कायम राहणार असल्याचे दिसते.
न. नि. पटेल हे सन २००० च्या दरम्यान संचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर अजय अंबेकर, आशुतोष घोरपडे हे दोनच पूर्णवेळ अधिकारी संचालक पदी राहीले. तर संचालकाची प्रभारी जबाबदारी असतानाही आयएएस अधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनीही चांगले काम केले. या अधिकाऱ्यांनी संचालकपदाची जबाबदारी सांभाळतांना, कलावंतांचे हित जपले. त्यांच्यासाठी अनेक योजना मार्गी लावल्या. मात्र काही संचालक आणि सहसंचालक केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी या पदावर रुजू होतात, हे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
आपली मुलं मुंबईत शिकतात अन् अचानक मुंबई बाहेर बदली झाली की कौटुंबिक अडचण निर्माण होते. मुंबई बाहेर जाण्यापेक्षा कुठंच काही नाही तर सांस्कृतिक कार्य संचालनालयात काही महिने काम करायचे, अशी धारणा काही अधिकाऱ्यांची असते. अनेक अधिकारी संचालनालयामध्ये रुजू झाल्यावर मनासारखे केंव्हाही.. कुठेही कार्यक्रमाच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन, भ्रमंती करण्याची संधी उपलब्ध होते म्हणून येतात. तर काही अधिकारी आपल्या मूळ खात्यांमध्ये वरिष्ठांशी जमत नाही किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून ती पीडा टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्याची सुखासुखी सेवा करायला उत्सुक असतात. आतापर्यत असे खूप कमी संचालक आणि सह संचालक या सांस्कृतिक कार्य संचालनालयाला मिळाले आहेत की, खरोखर त्यांना कलेबद्दल आत्मियता आहे किंवा लोककलावंतांसाठी काही तरी करावे, म्हणून काम केले. याबद्दल त्यांचे अजूनही कलावंत नाव काढत आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक या खात्याला केवळ “हौशे नवशे गवशे” अशा स्वरूपाचे संचालक आणि सहसंचालक मिळाले आहेत. असे अधिकारी कधी आले आणि कधी गेले, हे शेवट पर्यत कुणालाच कळाले नाही.
श्रीमती स्वाती काळे ह्या दि. ११ जुलै २०१९ रोजी संचालक पदावरुन कार्यमुक्त झाल्या आहेत. सध्या या पदाचा कार्य पद “भार” सहसंचालक सांभाळत असून विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण वेळ संचालक देण्याची मानसिकता संबंधित शासनाची दिसत नाही. त्यामुळे अनेक योजनांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण राहणार आहे ?
सांस्कृतिक कार्य खात्यातील काही अधिकारी ठरवून या पदावर पूर्ण वेळ संचालक येवू नयेत म्हणून प्रयत्न करीत असतात. सांस्कृतिक खात्यातील अंतर्गत वादामुळे जर वेळीच पूर्ण वेळ संचालक मिळाला नाही, तर सध्या सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी सांभाळत असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , त्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना शेवटी याकडे लक्ष घालावे लागणार आहे, हे स्पष्ट दिसते.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *