Breaking News

छगन भुजबळांसाठी पवारांनी लिहिले पत्र वैद्यकीय उपचार चांगले मिळावेत यासाठी मुख्मंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी

विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना चांगलेच वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्यासंदर्भात पहिल्यांदाच शरद पवार यांनी पत्र लिहिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भुजबळ यांना चांगले उपचार मिळण्याचा हक्क असल्याची आठवण शरद पवार यांनी पत्राद्वारे करून दिली.

भुजबळ हे राज्यातीलच नव्हे तर देशातील ओबीसी समाजाचे नेते म्हणून वावरले असून त्यांच्या मागे मोठा जनाधार आहे. तसेच ते राज्याचे गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि उपमुख्यमंत्री पदी राहीले आहेत. त्याचबरोबर ते मुंबई सारख्या शहराचे महापौर म्हणूनही वावरले असल्याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून देत त्यांची तब्येत सध्या चांगली नसल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे त्यांना इतरांप्रमाणे चांगले उपचार मिळविण्याचा हक्क असल्याची बाब त्यांनी पत्रात नमूद केली आहे.

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने योग्य ते आदेश संबधित प्रशासनाला द्याल अशी अपेक्षा बाळगत भुजबळ यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील अशी अपेक्षाही पवारांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

भुजबळांचे वाढते वय आणि त्यांना बळावलेले आजार लक्षात घेता त्यांना योग्य ते उपचार न मिळाल्यास आणि त्यांना काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर राहील असा इशाराही शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.

भुजबळांच्या वाढत्या आजाराच्या तक्रारीवरून विधानसभेत जितेंद्र आव्हाड तर विधान परिषदेत सुनिल तटकरे यांनी मागणी करत त्यांना योग्य ते उपचार मिळावेत अशी मागणी केली होती. त्यानतर आता पवार यांनी स्वत: पत्र लिहित त्यांच्या औषधपोचाराची काळजी घेण्याची मागणी केली आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *