Breaking News

आशिष शेलार म्हणाले, कालची ती सभा म्हणजे थू चाट होती भाजपाच्या उत्तर भारतीय संमेलनात केली टीका

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने वांद्रे-संकुल येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपासह राणा दांमप्त आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपाच्यावतीने गोरेगांव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित उत्तर भारतीय संमेलन सभेत भाजपाकडून चांगलेच उत्तर दिले. यावेळी बोलताना भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणाचा उल्लेख थू चाट सभा होती असा केला.

राजकारणात सगळे पक्ष विचलित होत आहेत. कुणी संकल्प सभा आयोजित करतय तर कुणी झेंड्याचा रंग बदलतोय. सत्तेमध्ये बसलेल्यांना तर काहीच कळत नाही, सगळे विचलित आहेत. हनुमान चालीसा म्हटली तर त्यांना तुरुंगवास होतोय. पण औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. हे कोणतं सरकार आहे? उद्धव ठाकरेंची कालची सभा पुचाट सभा होती आणि थू चाट सभा होती. म्हणजेच थुंकून चाटणे अशा खोचक भाषेत विखारी टीका केली.

पैसे खायचे तर कुठे खायचे, नाल्यात खाल्ले, गटारात खाल्ले, कचऱ्यामध्ये खाल्ले, पेंग्विनमध्ये खाले आणि आता तर उंदरात पण पैसे खाल्ले असा आरोपही त्यांनी यावेळी शिवसेनेवर केला.

झोपडपट्टी आणि फुटपाथावर राहणाऱ्या राहणाऱ्या लोकांना उंदरांचा त्रास आहे. याबाबत तुम्ही काय उपाय योजना केल्या असा सवाल विचारला असता, त्यांनी सांगितलं की, एका वार्डात एका महिना अशाप्रमाणे दहा हजार उंदीर मारले. संबंधित उदरं मारायला १ कोटी खर्च झाले. उंदीर कसे मारले. तर पटकून मारले. मेलेले उंदीर कुठे ठेवले, तर जमीनीत पुरले. संबंधित जमीन कुठे आहे, तर त्यावर झाडं लावली. लावलेली झाडं कुठे आहेत. तर वादळामुळे पडली. त्याचा पंचनामा अहवाल कुठे आहे. तर वॉर्ड ऑफिसमध्ये आहे. पण गेल्या महिन्यात पाऊस पडल्याने ते कागदं वाहून गेल्याची टीकाही त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *