Breaking News

शिंदे गटाकडून ‘युवासेने’चे पदाधिकारी जाहीर, मात्र पदाधिकारी मंत्री आणि आमदार पुत्र नवा घराणेशाहीचा पायंडा

बंडानंतर राज्यात शिवसेनेवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभा दावा केलेला आहे. यावरून न्यायालयीन लढाईही सुरु आहे. त्यातच आज शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेना लक्ष्य करत युवा सेनेचे नवे पदाधिकारी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी जाहिर केले. मात्र या जाहिर केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार पुत्रांची वर्णी लावत नवी घराणेशाहीला सुरुवात केली.

शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात न्यायालयीन संघर्ष सुरु असताना शिंदे गटाने शुक्रवारी युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर करून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये आदित्य ठाकरेंसोबत काम करणाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये बंडखोर आमदार पुत्रांचा मोठ्या संख्येने भरणा आहे.

एकनाथ शिंदे गटाचे सचिव किरण पावसकर यांनी आज युवा सेनेच्या कार्यकारिणीची घोषणा केली. शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची? याचा निकाल निवडणूक आयोगात लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये संघटनांचे पदाधिकारी महत्त्वाचे ठरू शकतात.

शिंदे गटाने युवा सेनेच्या कार्यकारणीत बंडखोर आमदार पुत्रांना स्थान दिले आहे. त्यात दादा भुसे, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, दिलीप लांडे, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, विजय चौगुले आदींच्या पुत्रांचा कार्यकारणीत समावेश आहे. हे आमदार पुत्र आजपर्यंत आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करत होते. सर्वच राजकीय पक्षांच्या युवा आघाड्यांत नेत्यांच्या मुलांना स्थान मिळते. शिंदे गटाने तोच कित्ता युवासेनेची कार्यकारणी नेमताना गिरवला आहे.

युवासेनेची कार्यकारिणी
उत्तर महाराष्ट्र : आविष्कार भुसे (दादा भुसे यांचे सुपुत्र)
मराठवाडा :अभिमन्यू खोतकर आणि अविनाश खापे-पाटील (अर्जून खोतकर यांचे सुपुत्र)
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : विकास गोगावले (भरत गोगावले), रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र : किरण साळी, सचिन बांगर ( संतोष बांगर यांचे सुपुत्र)
कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक.
ठाणे, नवी मुंबई, पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, ममित चौगुले, राहुल लोंढे
मुंबई : समाधान सरवणकर (सदा सरवणकर यांचे सुपुत्र), राज कुलकर्णी, राज सुर्वे (प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र), प्रयाग लांडे (दिलीप लांडे यांचे सुपुत्र)
विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

Check Also

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *