Breaking News

शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले, जे गेले ते ईडीच्या भीतीने… अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अनेक जण ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर शरद पवार असे दिलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज जे काही अजित पवारांनी केलं ते काही मला नवीन नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील हे सगळे जण सोडून गेले आहेत. पुढच्या दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल पण मी उद्यापासून मैदानात उतरणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केलं आहे.

तसेच शरद पवार म्हणाले की, तसेच जे गेले ते ईडीच्या कारवाईने गेल्याचे पवार यांनी सांगितले, यावेळी प्रसारमाध्यमांनी ईडीच्या रडारवर कोण कोण आहेत असा सवाल केला त्यावेळी शरद पवार म्हणाले की, प्रफुल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, नवाब मलिक अद्यापही आतमध्येच आहेत, अशी काही जणांची नावे असल्याने हे सर्वजण गेले असावेत कदाचित त्यांना ईडी पावली असेल असे सांगायलाही विसरले नाहीत.

तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला असता शरद पवारांनी हात उंचावून ‘शरद पवार’ असं उत्तर दिलं आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, माझा राज्यातील कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर खूप विश्वास आहे. राजकीय पक्षांची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. नाव, चिन्हावर हक्क सांगतील, पक्षावर दावा त्यांनी सांगितला आहे. मात्र तुमच्यात येऊन बोलण्यासाठी तर कुणी मला अडवू शकत नाही ना? असा प्रश्न शरद पवारांनी विचारत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तसंच आगामी काळात तुम्हाला राष्ट्रवादीची नवी टीम दिसेल असंही म्हणाले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही. याची मला खात्री आहे. मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली तेव्हा चिन्ह होतं बैलजोडी, त्यानंतर काँग्रेस फुटल्यावर आमची खूण होती चरखा. त्यानंतर गाय वासरु हे चिन्ह होतं. चार खुणा माझ्याच आयुष्यात मी लढलो. लोक खूण वगैरे पाहात नाहीत काय काम करु शकतो उमेदवार ते पाहतात. जनतेवर माझा विश्वास आहे. मला लोकांनी १४ वेळा निवडून दिलं आहे. त्याअर्थी माझ्यावर विश्वास असावा असंही म्हणाले.
यावेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकल्याचा मुद्दा उपस्थित करताच ते म्हणाले, ही गुगली नाही हा दरोडा टाकला असे प्रत्युत्तरही दिले.

वास्तविक पाहता पक्ष संघटना वाढविण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली त्यांनी जबाबदारी नीट पार पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात ते काय भूमिका मांडतात आणि यामागे काय ठरलं हे जनतेसमोर सांगतील त्यानंतर त्यांच्याबाबत काय तो निर्णय घेईन अन्यथा पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल असे सांगत काही जणांच्या भूमिकेनंतर मला तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांचा, काँग्रेस नेते राहुल गांधी, उध्दव ठाकरे यांचे आपल्याला फोन आल्याचेही सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *