Breaking News

दिशा सालियनबाबतचे ते वक्तव्य नारायण राणेंच्या अंगलट राज्य महिला आयोगाची बजावली नोटीस

दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा देताना दिशा सालियन हीच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करत त्यावेळी कोणत्या मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी तेथे हजर होती असा सवाल करत संशयाची सुई शिवसेनेच्या मंत्र्याकडे केली. त्यास ४८ तासाचा अवधी उलटत नाही, तोच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेत दिशा सालियनची बदनामी केल्याप्रश्नी मालवणी पोलिस स्टेशनला ४८ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून ते वक्तव्य राणेंच्या अंगलट येणार असल्याचे बोलले जात आहे.

दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊ केला होता. तसेच हत्येआधी बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे महिला आयोगाने यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिलेला असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले. यासंदर्भातील माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून दिली.

Check Also

काँग्रेसचे मराठवाड्यात येत असलेल्या पंतप्रधान मोदी यांना प्रश्न

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील सहभागी राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *