Breaking News

शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं…. अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यादाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे धुळे येथील मात्र वाय.बी.चव्हाण प्रतिष्ठान येथे आज रविवारी ३० जुलै रोजी इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन मंडळाने आयोजित ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत एक सूचक विधान केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, धुळ्यात जे काम सुरू आहे त्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्य सरकारशी बोलणं आम्हाला सध्या जरा अडचणीचं आहे. मात्र, त्यातून आज ना उद्या कधीतरी मार्ग निघतील. ज्यावेळी मार्ग निघतील त्यावेळी राज्य सरकारलाही या कामासाठी मदत करण्यासाठी भाग पाडण्यास फारशी काही अडचण येणार नाही.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं, तर कदाचित महाराष्ट्रात काही होईल. यापेक्षा विशेष वेगळं काही सांगायची गरज नाही. यातील राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने अशा संस्थांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, असं मतही व्यक्त केलं.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *