Breaking News

कौशल्य विकास केंद्रांना इसवी सन पूर्वीच्या ‘आचार्य चाणक्य’ यांचे नाव

इसवी सन पूर्वी उत्तर भारतात विशेषथः तक्षशीला आणि नालंदा या दोन्ही ठिकाणी मोठी विद्यापीठे होती. तसेच त्याचा राजा सम्राट धननंद हे होते. परंतु सम्राट धननंद  आणि आचार्य विष्णूगुप्त अर्थात आर्य चाणक्य यांच्यात त्यावेळी मतभेद झाल्याने सम्राट धननंद राजाचे राज्य उलथवून टाकण्यात आचार्य चाणाक्य याचे मोठे योगदान होते. परंतु नंतरच्या काळात भारतीय इतिहासा कारांनी आर्य चाणाक्य, आचार्य विष्णगुप्त, वास्तायण, आणि कौटील्य हे वेगवेगळे नव्हते तर एकाच व्यक्तीचे नाव होते असा दावा केला आहे. तर दुसऱ्याबाजूला काही इतिहासाकारांनी आर्य चाणक्य ही व्यक्ती त्याकाळी अस्तित्वात नव्हती असा दावा करत देशात धार्मिक वर्चस्ववाद निर्माण करण्याची पार्श्वभूमी निर्माण झाल्याने हे आर्य चाणाक्य ही व्यक्तीरेखा घुसडण्यात आल्याचा दावा काही इतिहासकारांनी केला आहे. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या अस्तित्वावरून इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं मतांतरे असताना राज्य सरकारने कौशल्य विकास केंद्रांना आर्य चाणक्य यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील शिक्षण तज्ञ आणि इतिहासाकारांमध्ये आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळून सध्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर इसवी सन पूर्वीच्या आर्य चाणक्य यांचे नाव सध्याच्या कौशल्य विकास केंद्राना देणे कितपत योग्य आहे असा सवाल काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. त्याशिवाय या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्राचीन काळातील धार्मिक वर्चस्ववादी काळात तर न्यायचे नाही ना असा सवालही काही इतिहासकारांनी उपस्थित केला.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे नाव देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये ही केंद्र सुरू होणार असून या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री यांनी केले.

‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील १०० महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राच्या ‘ऑनलाईन’ उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे उपस्थित होते. दृकश्राव्य प्रणालीद्वारे १०० महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. हे धोरण राबवल्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडतील. भारत हा जगातील तिसरी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. देशात प्रथम स्थानी येवुन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मानव संसाधन विकासावर शासनाने भर दिलेला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून

महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन युवक आणि युवतींना काळाशी सुसंगत असे आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या केंद्रातून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा. कोणत्याही विषयाची पदवी प्राप्त करून चालणार नाही तर त्यासोबत विविध कौशल्य प्राप्त केले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.

शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य मिळणार- मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री लोढा म्हणाले की, “पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळायला हवे. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवक युवतींना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील. या मार्फत राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १०० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु होत आहे. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु करण्याचे ध्येय आम्ही पूर्ण करू.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० अंतर्गत जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून महाविद्यालयामध्ये हे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.

कौशल्य प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रमांची निवड : आयुक्त निधी चौधरी

आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रथम ३५०० महाविद्यालयांमधून १०० महाविद्यालयांना निवडले आहे. टप्प्याटप्प्याने यामध्ये महाविद्यालय अधिकाधिक सहभाग वाढवला जाईल. प्रत्येक कौशल्य विकास केंद्रातून किमान १५० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. या कौशल्य विकास केंद्रातून २०० ते ६०० तासांपर्यंतचे सुसंगत अभ्यासक्रमांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे असेही सांगितले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे यांनी आभार मानले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *