Breaking News

१२ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनों या वेबसाईटवर वाचा तुमच्या अभ्यासक्रमाची पुस्तके कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई ; प्रतिनिधी

११ वीची परिक्षा दिली, निकाल येणे बाकी आहे. पुढचे वर्षे १२ वीचे आहे. आणि त्यात कोरोनाने घोळ घातलाय. किती दिवस घरात बंद रहावे लागेल याबाबत कोणतीच निश्चितता नाही. मात्र घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परिक्षेचा निकाल लागेल तेव्हा लागू द्या. मात्र तुम्हाला १२ वीचा अभ्यास सुरु करता यावा  याउद्देशाने सर्व अभ्यासक्रमाची पुस्तके ऑनलाईन स्वरूपात आणली असून ती पुस्तके, मोबाईल, लँपटॉपवर सहजरित्या वाचता येणार आहेत.

 बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लर्न फ्रॉम होम म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पुर्ण कसा करता यावा यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पिडीएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची  झुम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही.  या कालावधित अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर रेडीयो टिव्ही च्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरु आहे.

ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे  मराठी. हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.  या सर्व पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहे.

युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत),पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी) , महाराष्ट्री प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी),  युवकभारती – बंगाली (बंगाली),  युवकभारती – इंग्रजी​(इंग्रजी) युवकभारती – गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दु (उर्दु), युवकभारती – सिंधीन (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड) युवकभारती – तेलुगु (तेलुगु) शिक्षणशास्र​(मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दु), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दु), तर्कशास्र (इंग्रजी) बालविकास​(इंग्रजी), भौतिकशास्र​(इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग 2) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 1)​(इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग 2 ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी) , वाणिज्य संघटन व व्यवस्थापन​(मराठी, इंग्रजी) ,चिटणीसाची कार्यपद्धती ​(मराठी,इंग्रजी),अर्थशास्र (मराठी,इंग्रजी) ,जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी , इंग्रजी) ,इतिहास (मराठी),राज्यशास्र (मराठी , इंग्रजी), माहीती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी).

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *