Breaking News

मुंबईच्या सीएसएमटी World Heritage Building चा आज वाढदिवसः ४२५ विशेष ट्रेन

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रसिध्द अशा सीएसएमटीच्या इमारतीला पाहिल्यानंतर अनेकांना या इमारतीचे आश्चर्य वाटते. या इमारतीची भव्य अशी कलाकुसर, प्रत्येक ठिकाणी इमारतीची वैशिष्टेपूर्ण दगडी बांधकांमामुळे या इमारतीला भारतासह जगभरातील अनेक पर्यटक आवर्जून पहायला येतात. या इमारतीला आज ७२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मध्य रेल्वेने इमारतीला विद्युत रोषणाई केली. या विद्युत रोषणाईमुळे इमारत पूर्णतः उजळून निघाली असून आणखीनच तीचे सौदर्य खुलले आहे.

देशावर इंग्रजांचे राज्य असताना इंग्लडची राणी व्हिटोरिया (काही महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले.) आणि त्यांचे पती प्रिन्स चार्ल्स १७ वे हे मुंबई भेटीवर येऊन गेल्यानंतर या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. तसेच मध्य रेल्वेकडून मुंबई ते ठाणे आणि पुढे लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेचे मुख्यालय याच इमारतीतून हाकण्यास सुरुवात झाल्याने या इमारतीला आणि रेल्वे स्थानकाला व्हिटी स्टेशन म्हटले जात होते. १९९३ साली शिवसेना-भाजपाचे सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आल्यानंतर शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी या स्थानकाचे नाव व्हिटी ऐवजी शिवाजी महाराज स्थानक असे केले. नंतर त्याचा पुन्हा नाम विस्तार करत छत्रपती शिवाजी महाराज स्थानक अर्थात सीएसएमटी असे इंग्रजीत शॉर्टफॉर्ममध्ये करण्यात आले.

मात्र या इमारतीतील अंतर्गत डागडूजी आणि घडाळ्याची डागडूजी मुळ ढाच्याला धक्का न लावता आजही काळजीपूर्वक करण्यात येते. सीएसएमटीच्या इमारतीला पाहताना या इमारतीची भव्यता आजही पाहणाऱ्याला भावते. विशेष म्हणजे २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यातही आणि ७० वर्षे ऊन वारा पाऊस झेलूनही ही इमारत आजही उत्तम स्थितीत आहे. त्यामुळेच या इमारतीला जागतिक युनो संघटनेनेही world Heritage building यादीत समावेश केला.

आज ही इमारतीला ७२ वर्षे पूर्ण होत असून ही इमारत ७३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तसेच या इमारतीच्या वाढदिवसानिमित्त दिवाळी आणि छट पुजेच्या पार्श्वभूमीवर ४२५ विशेष ट्रेन सणासाठी सोडल्या आहेत. त्याची यादी खालील प्रमाणे…

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुंबईतील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा दस्ताऐवज २४ नोव्हें पर्यंत सादर करा

मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *