Breaking News

दिवाळीनिमित्त अनेक बँकांकडून गृहकर्जावर आकर्षक ऑफर जास्तीत जास्त ग्राहकांना खेचण्यासाठी ऑफर

भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीच्या या काळात लोक प्रमाणावर घरे आणि कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना गृहकर्जावर आकर्षक ऑफर देत आहेत.

एसबीआय धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने घरे आणि कार खरेदीदारांना खास ऑफर देत आहे. ही विशेष ऑफर १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान चालू आहे. एसबीआयच्या या विशेष योजनेत व्याजदरात मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. ग्राहकांना क्रेडिट स्कोअरनुसार ०.६५ टक्के कमाल सवलतीचा लाभ मिळत आहे.

तुमचा सिबिल स्कोअर ७०० ते ७४९ दरम्यान असेल तर तुम्हाला ८.७ टक्के दराने गृह कर्ज मिळेल. आधी हा दर ९.३५ टक्के होता. सिबिल स्कोअर ७५० ते ७९९ दरम्यान असेल ८.६ टक्क्यांच्या विशेष दराने कर्ज मिळेल. सिबिल स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ८.६ टक्के व्याज दर असेल.

पंजाब नॅशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना गृह कर्जावर चांगली ऑफर देत आहे. बँक ८.४० टक्के दराने गृहकर्ज देत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांवर बँक कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही.

बँक ऑफ बडोदाने दिवाळीनिमित्त ‘फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी’ नावाची विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध आहे. या फेस्टिव्हल ऑफरद्वारे ग्राहकांना ८.४० टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. यासोबतच बँक ग्राहकांकडून शून्य प्रक्रिया शुल्क आकारत आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *