टायगर ३ ‘हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘टायगर ३’ हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टायगर आणि टायगर जिंदा है या दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्ड तोड कामे केली होती.
‘टायगर ३’ सिनेमाच्या तिकीटांची ५ नोव्हेंबरपासून अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाची ४४ हजार ५०० तिकिटे विकली गेली. याआधी शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी १५ लाख तिकिटांची विक्री झाली होती. टायगर ३ हा चित्रपट शारुख खान च्या जिवांचे रेकॉर्ड मोडणार का हे पाहावे लागणार आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला जबरदस्त सुरुवात झाली आहे.आपल्या ट्विटमध्ये त्यांनी निवडक शहरांच्या आगाऊ बुकिंगची माहिती दिली. अनेक शहरांमध्ये या चित्रपटाचे मॉर्निंग शो देखील आयोजित करण्यात आले आहेत. तसेच टायगर ३ च्या टीमडून या चित्रपटाची जोरदार पब्लिसिटी करण्यात येत आहे.