Breaking News

मुंबई

मंत्री लोढा यांची घोषणा, बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी

इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात काम मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्री लोढा म्हणाले की, …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले “हे” आदेश

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना बैठकीत दिले. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा …

Read More »

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय …

Read More »

माजी पोलिस महासंचालक बनले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

राज्याचे माजी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना त्यांच्या निवृत्तीनंतर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविला आहे. त्यानंतर रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. पांढरपट्टे यांनी सेठ यांचे पुष्पगुच्छ …

Read More »

महावितरणची नव्या वर्षाची भेटः नवीन वीजजोडणी तात्काळ उपलब्ध होणार

कृषीपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी (NSC) योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभरः पण दिवा येथे कधी ?

मागील काही महिन्यांपासून राज्यातील वाढते प्रदुषण आणि शहरातील घाणीच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत मुंबईतील अनेक भागात सकाळपासून प्रदुषण रोखण्यासाठी आणि स्वच्छ मुंबईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र ठाणे शहराचा भाग असलेल्या दिवा शहरात मुख्यमंत्री शिंदे हे कधी स्वच्छता मोहीम राबविणार असा सवाल दिवा येथील रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा आता नितीन करीर यांच्याकडे

महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ नितीन करीर यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिव पदाचा कार्यभार मनोज सौनिक यांच्या कडून स्वीकारला. डॉ. नितीन करीर सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव …

Read More »

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी …

Read More »

ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता “राज्य क्रीडा दिन” सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदानात वाढ- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय …

Read More »

जागतिक कौशल्य स्पर्धा – २०२४ साठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही फ्रांस (ल्योन) येथे होणार असून देशातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त र.प्र सुरवसे यांनी केले आहे. …

Read More »