Breaking News

मुंबई

विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीला धक्का; देशमुख-मलिक यांना परवानगी नाहीच तात्पुरता जामिन देण्यात न्यायालयाचा नकार

राज्यसभा निवडणूकीच्या वेळी मतदान करता यावे याकरिता मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख यांनी तात्पुरता जामीन मिळावा यावा अशी मागणी करणारी याचिका विशेष न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात केली. मात्र त्यावेळी ईडीने केलेला युक्तीवाद या दोन्ही न्यायालयाने मान्य करत तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला. आता पुन्हा एकदा विधान परिषद …

Read More »

पर्यटकांच्या सोयीसाठी गेट वे ऑफ इंडियासह ‘हि’ ठिकाणे आकर्षक करणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराचा पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विकास करून तो अधिक आकर्षक करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसराचा विकास करण्यासाठी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा …

Read More »

मंत्रालय मधील कर्मचाऱ्यांना, सहायक कक्ष अधिकारी होण्याची संधी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

मंत्रालय मधील विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षेची पात्रता आणि अभ्यासक्रमाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यासाठी पात्रता :- (अ) परीक्षेला बसण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने (i) लिपिक-टंकलेखक पदावरील नियमित सेवेची पाच वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. (ii) लिपिक-टंकलेखक …

Read More »

दिवा वासियांसाठी खुषखबर; पाणी प्रश्न निकाली, वाढवून मिळणार आता सहा दशलक्ष लीटर पाणी मिळणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झालेली असतानाच आणि आगामी ठाणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवा वासियांना सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. दिवावासियांना मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली असून सहा दशलक्ष लीटर पाणी वाढीव स्वरूपात देणार आहे. तसेच हे वाढीव पाणी मंगळवारपासून मिळणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री तथा …

Read More »

राज्यसभा निवडणूकः ईडी म्हणते, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही न्यायालयाकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा

राज्यसभा निवडणूकीत मतदान करता यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी तात्पुरता जामिन मिळावा याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच मतदान करण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा अशी मागणीही केली. त्यावरील आज झालेल्या सुनावणी दरम्यान सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने विरोध केला. त्यामुळे या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने …

Read More »

सह्याद्रीवरील ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ भारदस्त आवाज लोपला ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन

काही वर्षांपूर्वी दुरदर्शनवर मराठी बातम्यांना सुरुवात झाल्यानंतर ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ अशी धीर गंभीर आवाजात सुरुवात करत बातम्या पाहणाऱ्या प्रेक्षकाला टिव्हीसमोर खिळवून ठेवणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदिप भिडे यांचे आज मुंबईत वयाच्या ६४ व्या वर्षी आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा …

Read More »

मेट्रो कारशेड वाद; केंद्राची न्यायालयात स्पष्टोक्ती, कांजूरची जागा आमचीच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

मेट्रो कारशेडवरून काहीही करून कांजूर मार्ग येथील जागेत उभारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आग्रही आहेत. तर दुसऱ्याबाजूला केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसीतील जागा न देण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. या दोन्ही जागांवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आज केंद्र सरकारने कांजूर मार्गची जागा आमचीच असल्याचे …

Read More »

अमृता फडणवीस यांचे पुन्हा गाळलेल्या जागा भराचे ट्विट, शिवसेनेवर निशाणा मुंबईतील रस्त्यावरून टीका

राज्यातील आता पर्यतच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नींपेक्षा सर्वाधिक चर्चेत असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने समाज माध्यमावर काहीतरी लिखाण करत असतात. त्यातून बऱ्याचवेळा नव्या वादाला जन्म देतात तर कधी वाद ओढवून घेतात. तर कधी त्या राजकिय टीका टिप्पणी करून चर्चेत येतात. आज अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर …

Read More »

मुंबईसाठी पुढील दोन आठवडे महत्वाचे कोरोना चाचण्या वाढवा, आयुक्त चहल यांचे निर्देश

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोविड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या …

Read More »

मुंबईतील “हे” वार्ड झाले महिला आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित २३६ पैकी ११८ आरक्षित जागांसाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत संपन्न

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी ११८ प्रभाग आरक्षित असून, यासाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत आज काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरात असणा-या रंगशारदा नाट्यगृह येथील विद्याधर गोखले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम …

Read More »