Breaking News

मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा: २ वर्षात मुंबई होणार रस्ते खड्डेमुक्त, सिमेंटचे रस्ते सध्या २३६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु तर ४०० किलोमीटरची कामे प्रस्तावित

मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारीत रस्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश : ठाण्यातील ‘या’ महानगरपालिकांना अतिरिक्त पाणी द्या दिवा, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे जिल्हा व शहर

ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नांची आढावा …

Read More »

एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज, राज्य सरकारने दिली हमी ठाणे कोस्टल रोड, भुयारी मार्ग, शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी कर्ज

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; रेल्वे बंद झाली तर बसेस रस्त्यावर आणा महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले २४ तासात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रेल्वेची २५ अशी ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी …

Read More »

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या कोकणात ७४ गाड्या, आरक्षण ‘या’ तारखेपासून रेल्वे विभागाने जारी केली माहिती

जून महिना संपूर्ण पावसाविना गेला. तर ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र मागील दोन दिवसांपासून कोकणसह राज्यातील काही भागात पाऊसाने चांगली हजेरी लावलेली दिसत आहे. तशातच पुढील महिन्यात शेवटच्या आठवड्यात गणरायाचे आगमन होत असल्याने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अडचण होवू नये म्हणून मध्य रेल्वेकडून …

Read More »

विद्यमान संजय पांडे निवृत्त होण्याआधीच मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर राज्य सरकारकडून एक दिवस आधीच नियुक्ती जाहिर

मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त संजय पांडे हे अधिकृतरित्या उद्या ३० जून रोजी सेवानिवृत्ती होत आहेत. त्यामुळे रिक्त होत असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. गृह विभागाने बुधवारी फणसळकर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. …

Read More »

कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ; मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून पाच लाखांची मदत

मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरातील नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून काल रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूचे वृत हाती आले असून त्यात संध्याकाळी आणखी वाढ होवून १९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे वृत्त कळताच मध्यरात्री नंतर पहाटे …

Read More »

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ३० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

मत्स्य व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन असे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील वर्सोवा येथील प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाच्या १२८ व्या सत्रासाठी इच्छूकांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत …

Read More »