Breaking News

मुंबई

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, वर्षा बंगल्याच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना सोयी-सुविधा द्या ‘तोरणा’ बंगल्यात पोलिसांसाठी असलेल्या सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थान आणि मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी बंदोबस्तावर सातत्याने पोलिस आणि अधिकाऱ्यांना तैनात रहावे लागते. या पोलिसांना कपडे बदलण्यापासून जेवण आणि नैसर्गिक विधीकरीता वर्षा शेजारीच असलेल्या तोरणा बंगल्यात तात्पुरती पोलिसांची व्यवस्था करण्यात आली. मात्र  ‘तोरणा’ बंगल्यात पोलिसांच्या संख्याबळाच्या तुलनेत फारशा सोयी-सुविधा नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे मुख्यमंत्री …

Read More »

असा रंगला अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीनचा सोहळा चार वयोगटातील महिलांना विजेते पद

स्त्रियांशी निगडीत उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या अनाहत इव्हेंट्सने आयोजित केलेल्या ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन’ चा किताब वेगवेगळ्या वयोगटातील सुषमा बेर्डे, मैथिली आंगचेकर, शर्विता शिंपी, तेजश्री हडवळे – मोरे यांनी पटकावला. ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन २०२२’ या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी वाशीतील इम्पेरिअल बँक्वेट येथे दिमाखात पार पडली. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या चारही …

Read More »

फोगाट मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गरज पडल्यास सीबीआयकडे हरियाणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या फोननंतर दिली माहिती

हरियाणातील भाजपा नेत्या तथा बिग बॉस फेम आणि टीक टॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन माहिती पुढे येत आहे. गोवा पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करत तिच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली. दरम्यान या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास गरज पडल्यास सीबीआयकडे सोपविण्याची तयारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी ST ने १.५० लाख चाकरमानी कोकणकडे होणार रवाना एसटीच्या ३ हजार ४०० गाड्यांचे आरक्षण फुल; १९०० गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी सुमारे १.५० लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होणार आहेत. गणेशोत्सवासाठी ST अर्थात एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य …

Read More »

अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात आली चक्कर; रूग्णालयात दाखल जे जे रूग्णालयात केले दाखल

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. अनिल देशमुख सध्या …

Read More »

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘या’ विभागाकडे मिळणार टोल माफीचे पासेस पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री …

Read More »

एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर कडी, मुंबईत २२७ च वॉर्ड, कारभाराची एसीबी मार्फत चौकशी विधानसभेत विधेयकाला अखेर मंजुरी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या वार्डांच्या संख्येत वाढ करत त्यास विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूरीही केली. मात्र सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय रद्दबादल ठरवित मुंबई महापालिकेत जून्याच पध्दतीने वार्ड रचना ठेवण्याचे सुधारीत विधेयक मंजूर करत मुंबई महापालिकेच्या काराभाराची एसीबी मार्फत …

Read More »

मंत्रालयाच्या टेरेसवर दोघे जण चढले, आत्महत्या करण्याचा दिला इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने तरूण उतरले खाली

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र दुपारी उस्मानाबादच्या शेतकऱ्यांने विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स सिनेमागृहासमोर स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत सदर शेतकऱ्याला वाचविले. ही घटना ताजी असतानाच मंत्रालयाच्या टेरेसवर दोन तरूण चढून आपल्या मागण्याप्रश्नी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याची आणखी एक घटना …

Read More »

आता काँग्रेसचे राज्य सरकारच्या विरोधात ‘चिपकू’ आंदोलन आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणार

मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडचा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल केला. तसेच मेट्रोचे कारशेड कांजूर मार्ग नव्हे तर आरेतच होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयाच्या विरोधात आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र …

Read More »

काँग्रेस करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन ‘आरे वाचवा’साठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर उद्या आंदोलन !: समीर वर्तक

मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या रविवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण …

Read More »