Breaking News

मंत्रालयाच्या टेरेसवर दोघे जण चढले, आत्महत्या करण्याचा दिला इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने तरूण उतरले खाली

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र दुपारी उस्मानाबादच्या शेतकऱ्यांने विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स सिनेमागृहासमोर स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत सदर शेतकऱ्याला वाचविले. ही घटना ताजी असतानाच मंत्रालयाच्या टेरेसवर दोन तरूण चढून आपल्या मागण्याप्रश्नी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याची आणखी एक घटना पुढे आली आहे.

सुदैवाने या दोन्ही युवकांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी संवाद साधून त्यांना खाली उतरविले आणि त्यांची समजूत घातली. सदर हे दोन्ही तरूण मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर पोहोचले होते. या दोन्ही तरूणांची नावे कळू शकली नाहीत.

संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान दोन युवक मंत्रालयाच्या टेरेसवर चढले. टेरेसवरील कठड्यावर बसून हे धरून आत्महत्या करण्याचा इशारा देवू लागले. या तरूणांचे प्राण वाचविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलविण्यात आले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना ही माहिती कळताच त्यांनी तरूणांशी संवाद साधून त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु तरूणांनी कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला तर टेरेसवरून उडी मारण्याचा इशारा दिला.

त्यानंतर या तरूणांची लंके यांनी समजूत घालत त्यांना टेरेसवरून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा एकदा लंके यांनी या दोन तरूणांची समजूत घातली.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *