Breaking News

मुंबई

शिवसेना-शिंदे गट आमने सामने: नेमके काय झाले त्या रात्री? शिंदे गटाचे कार्यकर्त्ये संतोष तेलवणे यांनी सांगितला घटनाक्रम

गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्री प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झाले. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळेस शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात हवेत गोळीबार केला, असा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप …

Read More »

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्यूमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: लक्ष घालत ते मुंबईत …

Read More »

गणेश विसर्जनानंतर स्काऊटचे विद्यार्थी आणि मनसेने केली चौपाट्यांची स्वच्छता दादर, गिरगावंसह अनेक चौपाट्या झाल्या स्वच्छ

गणेश विर्सजन झाल्या नंतर गिरगांव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्मल्यांची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे ४०० सभासद एन.सी.सी. मधील १५०० मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन …

Read More »

राजभवन पुन्हा नागरीकांसाठी खुले पण ‘या’ तारखेपासून १ ऑक्टोबर पासून राजभवन भेट पुन्हा सुरु

मुंबईतील अनेक प्रेक्षणीयस्थळापैकी एक असलेले राज भवन आता पुन्हा एकदा नागरीकांसाठी खुले झाले आहे. राज भवनातील ब्रिटीशकालीन बंकर, सुर्योदयाचा पॉईंट सारख्या अनेक गोष्टी येथे पाहण्यासाठी आहेत. पावसाळ्यानिमित्त हे राजभवन पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर १ ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. १० सप्टेंबर …

Read More »

मुंबईतील गणेशोत्सवांना आणखी १५ देशांच्या महावाणिज्य दूतांनी दिल्या भेटी गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल-- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून परदेशात प्रचार-प्रसार होऊन लाखो भाविक पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि नजिकच्या काळात हा उत्सव जगातील महाउत्सव बनेल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी शासन …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेच्या जिल्यात नगरविकास विभागाच्या सचिवांचा दौरा, दिले ‘हे’ आदेश बैठक घेत केंद्राच्या योजना राबविण्याचे दिले आदेश

केंद्र, राज्य शासनाचे महत्वाचे लाक्षणिक विकासाचे प्रकल्प कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर महापालिकांमध्ये सुरू आहेत. हे सर्व विकासाचे प्रकल्प शासन सहकार्यातून गतीने पूर्ण करा. या विकास प्रकल्पांमध्ये काही तांत्रिक, शासन स्तरावरुन काही अडचणी असतील तर त्या तातडीने मार्गी लावल्या जातील, असे राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी …

Read More »

फुटबॉल प्रेमींसाठी खुषखबरः फिफा विश्वचषकचे अंतिम सामने नवी मुंबईत राज्यात फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार-क्रीडा मंत्री गिरीश महाजन

राज्यात १७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२ चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असून ही स्पर्धा भारतीय मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मंत्री महाजन …

Read More »

‘या’ देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले मानाच्या गणपतीचे दर्शनः व्यक्त केली ‘ही’ प्रतिक्रिया "अद्भुत अनुभूती!" गणरायांच्या दर्शनानंतर महावाणिज्य दूतांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तिभावाने भारावलेले वातावरण पाहून “अद्भुत अनुभूती” आल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने आज महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घडवून आणण्यात आले. लालबाग येथील गणेश गल्लीच्या …

Read More »

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचा-यांचा सेवानिवृत्तीचा कालावधी कधी वाढविणार राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याच्या प्रलंबित निर्णयावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली. राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ७५ हजार जागांसाठी भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे …

Read More »

पक्षाचा फलक लावण्यावरून मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला ढकलून देत मारहाण महिला दोनवेळा पडली तरी मारहाण सुरुच ठेवली

सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात सुरु आहे. मात्र मुंबादेवी परिसरात गणपती मंडपाच्या लागून पक्षाचा फलक लावण्यावरून एका महिलेने मनसे पदाधिकाऱ्याला हरकत घेतली. मात्र या पदाधिकाऱ्याने महिलेला ढकलून देत मारहाण केल्याचा एक व्हिडिओ प्रसारीत झाला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करताना सदरची महिला दोन वेळा पडली तरी मनसे पदाधिकाऱ्याने मारहाण करतच राहिल्याचे दिसून …

Read More »