Breaking News

शिवसेना-शिंदे गट आमने सामने: नेमके काय झाले त्या रात्री? शिंदे गटाचे कार्यकर्त्ये संतोष तेलवणे यांनी सांगितला घटनाक्रम

गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्री प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झाले. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळेस शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात हवेत गोळीबार केला, असा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला. परंतु शनिवारी मध्यरात्री नेमकं काय झाल याबाबत शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी एका वृत्त वाहीनीशी बोलताना सांगितली घटना.

काल रात्री मी माझ्या बिल्डिंगखाली उभा होतो तेव्हा उध्दव ठाकरे गटाचे ५० जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो? पण मीसुद्धा या ५० जणांना पुरुन उरलो. मी त्यांना म्हणालो तुम्हाला हात लावायचा असेल हात लावा मला ठार मारा. जिवंत ठेवलात तर तुम्हा ऐकेकाला घरातून उचलून नेईन. मला केवळ उद्धव ठाकरेंचं वाईट वाटतं. पूर्वीची शिवसेना आता राहिली नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चाललेलो शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्यात हिंमत आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेल्याचे तेलवणे यांनी सांगितले.

सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या आरोपावर तेलवणे म्हणाले की, गोळीबार हा वाघावर होतो, शेळ्यांवर नाही. पोलीस ठाण्यात कोणताही गोळीबार झाला नाही. अटक करण्यासाठी आणि प्रकरण वाढवण्यासाठी ही खोटी बातमी पसरवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरुन २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ शिवसैनिकांना अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, शिंदे आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावरुन एकमेकांना डिवचण्यात आलं होतं. एकमेकांविरोधात जोरादर घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं होतं. शनिवारी मध्यरात्री शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘आवाज करणार…तर…ठोकणारच…आज पेग्विन सेनेला…स्वतःची लायकी समजलीच असेल..’ असं म्हणत संतोष तेलवणे यांनी फेसबकुवर एक व्हिडीओ पोस्ट केला.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *