Breaking News

राजभवन पुन्हा नागरीकांसाठी खुले पण ‘या’ तारखेपासून १ ऑक्टोबर पासून राजभवन भेट पुन्हा सुरु

मुंबईतील अनेक प्रेक्षणीयस्थळापैकी एक असलेले राज भवन आता पुन्हा एकदा नागरीकांसाठी खुले झाले आहे. राज भवनातील ब्रिटीशकालीन बंकर, सुर्योदयाचा पॉईंट सारख्या अनेक गोष्टी येथे पाहण्यासाठी आहेत. पावसाळ्यानिमित्त हे राजभवन पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर १ ऑक्टोबर पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. १० सप्टेंबर पासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन भेटीची वेळ सकाळी ६ ते सकाळी ८.३० ही असेल व प्रतिदिवशी ३० लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट येईल. राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील.

सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळवण्यात आले आहे. दिवाळीमुळे २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.

Check Also

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *