Breaking News

असा रंगला अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीनचा सोहळा चार वयोगटातील महिलांना विजेते पद

स्त्रियांशी निगडीत उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या अनाहत इव्हेंट्सने आयोजित केलेल्या ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन’ चा किताब वेगवेगळ्या वयोगटातील सुषमा बेर्डे, मैथिली आंगचेकर, शर्विता शिंपी, तेजश्री हडवळे – मोरे यांनी पटकावला. ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन २०२२’ या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी वाशीतील इम्पेरिअल बँक्वेट येथे दिमाखात पार पडली. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या चारही गटातील ३१ स्पर्धकांमध्ये मोठी चुरस होती.

श्वेता वैद्य प्रस्तृत आणि पॉवर्ड बाय एन.एम. एंटरप्रायझेस ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन २०२२’ स्पर्धा चार वयोगटात पार पाडली. स्पर्धेसाठी १० ते १६, १६ ते २५, २५ ते ४० आणि ४० ते ६० असे वयोगट होते. यावेळी बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे, अभिनेत्री नम्रता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सौंदर्य, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि गुणवत्ता यांचा मिलाफ दिसून आलेल्या स्पर्धकांच्या विविध कलागुणांनी परिक्षकांसह उपस्थितांचे पारणे फिटले. शिव ठाकरे यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. या श्रावण क्वीन स्पर्धेच्या माध्यमातून चित्रपटसृष्ठीला चांगल्या अभिनेत्री मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्पर्धेसाठी गायत्री दिक्षित, स्नेहल भोपळे, अर्जिता कुलकर्णी, वनश्री पांडे, पूनम मयेकर शर्मा या परिक्षक होत्या.

ग्लॅमर आणि मनोरंजनविश्वाला गुणी कलाकार मिळण्यासाठी अनाहत इव्हेंट्सने ‘अनाहत महाराष्ट्र श्रावण क्वीन’ स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी खंबीर पाठबळ मिळाले ते निलेश मुणगेकर यांच्या एन.एम. एंटरप्रायझेसचे. यंदाचे स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे. तब्बल २५० स्पर्धकांमधून ३१ जणींची अंतिम फेरीत निवड झाली. पारंपारिक वेशभूषेतील सोलो रॅम्पवॉक, स्वताची ओळख, वेस्टन वेषभूषा फेरीतील रॅम्पवॉक यातून स्पर्धकांनी आपल्यातील चुणुक दाखवून दिली. परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून अनेक स्पर्धकांनी वाहवा मिळवली.

४० ते ६० वयोगटातील महिलांचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्ये ठरले. यातील सर्वाधिक वय असलेल्या ५३ वर्षांच्या सुषमा बेर्डे यांनी या गटातील श्रावण क्वीनचा मान पटकावला. इमिटेशन ज्वेलरी आणि गणेशोत्सवात गणेश मूर्तीवर दागिने घडवण्याचा त्यांच्या व्यवसाय आहे. त्यांनी दागिने घडवलेली गणेश मूर्ती मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सलग ११ वर्ष विराजमान होत आहे. तसेच त्या अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत.

ही स्पर्धा अनाहत इव्हेंट्सचे क्रिएटिव्ह डायरेक्टर सचिन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेसाठी गिफ्टींग पार्टनर वनश्री पांडे यांची नयापन क्रिएशन, प्रिती कदम यांची अस्मी क्रिएशन, , कृपाली चौबळ यांची अलंक्रिता फॅशन, राजेश आंगचेकर यांचे मामाचो गाव आणि रुपाली राजेश यांचे बेक्वेल आदी होते. कोहीनूर कॉन्टिनेंट हे हॉस्पॅटिलिटी पार्टनर, कॉश्चुम पार्टनर एन. जे. डिझायनर आणि वेलनेस पार्टनर वॉरियर ग्रॅव्हिटी च्या रसिका कुलकर्णी आणि शार्दुला कुलकर्णी हे होते.

वयोगटानुसार विजेते
१० ते १६ वयोगट
विजेती – मैथिली आंगचेकर, पहिली रनरअप – श्रीनिधी पारटे, दुसरी रनरअप – श्रद्धा सुतार, तिसरी रनरअप निधीता भिडे

मिस कॅटॅगरी (१६ ते पुढे )
विजेती – शर्विता शिंपी, पहिली रनरअप – दिपीका महाजन, दुसरी रनरअप – श्वेता जगताप, तिसरी रनरअप दुर्गा होन

गोल्ड १ कॅटॅगरी (२५ ते ४०)
विजेती – तेजश्री हडवळे – मोरे, पहिली रनरअप – सारिका म्हात्रे, दुसरी रनरअप – उषा विश्वकर्मा, तिसरी रनरअप – अपूर्वा सांगुर्डेकर

गोल्ड २ कॅटॅगरी (४० ते ६०)
विजेती – सुषमा बेर्डे, पहिली रनरअप – अपर्णा ओवळेकर, दुसरी रनरअप – पल्ल्वी आठवले, तिसरी रनरअप – सोनिया फर्नांडिस

Check Also

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *