Breaking News

मुंबईतील “हे” वार्ड झाले महिला आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित २३६ पैकी ११८ आरक्षित जागांसाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत संपन्न

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी ११८ प्रभाग आरक्षित असून, यासाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत आज काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरात असणा-या रंगशारदा नाट्यगृह येथील विद्याधर गोखले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, मा. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उप आयुक्त अविनाश सणस व अवर सचिव अतुल जाधव, महानगरपालिकेचे उप आयुक्त (विशेष, निवडणूक) संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप निवडणूक अधिकारी सुधाकर ताडगे यांच्यासह संबंधित अधिकारी – कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. आजच्या सोडतीच्या सुरुवातीला महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आज संपन्न झालेल्या सोडती दरम्यान प्रभाग क्रमांकाची नांवे लिहिलेल्या चिठ्ठया उचलण्याची कार्यवाही ही ‘एच पश्चिम’ विभागात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने केली. या सोडतीसाठी गेल्या ३ सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभागनिहाय आरक्षणाच्या आधारे यंदाच्या निवडणुकीसाठी प्राधान्यक्रम निर्धारित करण्यात आला होता. या अंतर्गत गेल्या ३ सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान ज्या प्रभागांमध्ये संबंधित आरक्षण नव्हते, त्यांना ‘प्रथम प्राधान्यक्रम’ निश्चित करण्यात आला होता. या प्रथम प्राधान्यक्रमानुसार अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित करण्यात आले. या १५ प्रभागांपैकी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असलेल्या ८ जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यानंतर अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असणा-या २ जागांपैकी एका जागेकरिता सोडत काढण्यात आली.

आजच्या सोडती दरम्यान सर्वांत शेवटी २१९ सर्वसाधारण प्रभागांपैकी महिलांसाठी आरक्षित असलेल्या १०९ जागांच्या आरक्षणाचे निर्धारण करण्यात आले. या १०९ जागांपैकी ‘प्राधान्यक्रम १’ नुसार ५३ प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. तर ‘प्राधान्यक्रम २’ नुसार ३३ प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. तर उर्वरित २३ जागांसाठी सोडतीद्वारे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणारे प्रभाग घोषित करण्यात आले. आजच्या सोडतीच्या अनुषंगाने आवश्यक ती तांत्रिक माहिती उप निवडणूक अधिकारी सुधाकर ताडगे यांनी सहज-सोप्या भाषेत उपस्थितांना दिली.

आरक्षित वार्डांची यादी खालीलप्रमाणेः

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *