Breaking News

मुंबईकरांना दिलासाः एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के घट पण नोटीफिकेशन काढल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबईकरांना गारेगार प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एसी लोकल रेल्वे मुंबई सीएसटीएम, चर्चगेट ते डहाणू आणि कसारा कर्जत आणि पनवेल दरम्यान सुरु करण्यात आली. त्यातच या एसी गाड्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात असल्याने या गाड्याने प्रवास करण्याचे मुंबईकरांकडून टाळले जात होते. तसेच या लोकलचे तिकिट दरही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर राहीले. त्यामुळे एसी लोकलच्या गाड्या अनेकदा विना प्रवाशीच धावत असल्याचे चित्र पहायला मिळाले. यापार्श्वभूमीवर एसी लोकल गाड्यांच्या प्रवासी तिकिट दरात थेट ५० टक्के कपात करण्याचा निर्णय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केला.
पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व रेल्वे मार्गावर मिळून जवळपास ९० लाखापर्यंत लोक हे दररोज लोकलने प्रवास करतात. सीएसएमटी ते पनवेल-कसारा-कर्जत असा मध्य रेल्वेचा पसारा असून चर्चगेट ते डहाणू असा पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेचा पसारा आहे. या दोन्ही मार्गावर एकुण २९०० लोकलच्या फेऱ्या दररोज होत असतात.
असं असतांना या मार्गांवर विविध ठिकाणी एसी लोकल ( वातानुकूलित लोकल)च्या अत्यंत मर्यादीत फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र या एसी लोकलचे तिकीटाचे आणि दैनंदिन पासचे दर हे अव्वाच्या सव्वा – सर्वसामान्यांच्या बजेटच्या पलिकडे असल्याने या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यातच काही एसी लोकलच्या फेऱ्या या ऐन गर्दीच्या वेळी सुरु केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कारण एक लोकल कमी करत ही एसी लोकल आल्याने, यामधून फार कमी प्रवासी प्रवास करत असल्याने या लोकलच्या मागे-पुढे असलेल्या लोकलमधील गर्दी वाढलेली बघायला मिळाली. त्यामुळे या एसी लोकल बंद करण्याची मागणी प्रवाशांकडून व्हायला लागली होती.
आज भायखळा इथे झालेल्या रेल्वेच्या एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी करत असल्याचे जाहीर केले. यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागाचे ते आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चेगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे ते आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत.

असे असतील सुधारीत दर-

किलोमीटर    सध्याचे दर      सुधारीत दर
५                     ६५                     ३०
२५                  १३५                    ६५
५०                  २०५                    १००
१००                २९०                     १४५
१३०                ३७०                      १८५
असं असंल तरी रेल्वे राज्यमंत्री यांनी तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी केले आहेत, याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र स्पष्ट केलेले नाही. मात्र कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, आज मी घोषणा केली आहे. लवकरच दिल्लीला जाणार असून त्यानंतर यासंदर्भातील नोटीफिकेश काढण्यात येईल. नोटीफिकेशन काढलेल्या दिवसापासून मग अर्धा तिकिट दरात एसी लोकलने प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *