Breaking News

निवडणूक कामावर हजर होण्यासाठी जाणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू आयोगाने गंभीर दखल घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
निवडणूकीच्या कालावधीत अनेक शासकिय कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना निवडणूक कामाकरीता तात्पुरत्या स्वरूपात आयोगाच्या अखत्यारीत नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेक अधिकारी-कर्मचारी कधी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तर कधी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना मिनतवाऱ्या करतात. परंतु निवडणूक कामासाठी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाताना मंत्रालयातील एका वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली.
मंत्रालयातील नगरविकास विभागातील लिपिक टंकलेखक सुनिल रामचंद्र पवार (रा. वसई) यांना मतदार नोंदणी अधिकारी, १७५- कलिना विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय, म.न.पा. मंडई इमारत, आराम सोसायटी लेन, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई या कार्यालयात निवडणूक कामाकरीता हजर राहण्याचे आदेश नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने बजावले. तसेच त्यांना तेथील कामकाजाकरिता १९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यमुक्त करण्यात आले. त्याअनुषंगाने सुनिल रामचंद्र पवार हे २० सप्टेंबर २०१९ रोजी १७५- कलिना विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर हजर राहण्यासाठी जात असताना पवार यांच्या मनावर प्रचंड तणाव आणि दडपण आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.
विशेष म्हणजे पवार यांना निवडणूक कामासाठी कलिना येथे हजर राहण्याचे आदेश मिळताच त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता अशी माहितीही नगरविकास विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *