Breaking News

महायुतीतील महाराष्ट्र क्रांती सेना स्वतंत्र १०० जागा लढविणार ३० उमेदवारांची यादी जाहिर

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभेचे बिगूल वाजताच भाजपा-शिवसेनेचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने महायुतीतून फारकत घेत स्वतंत्रपणे १०० जागा लढविण्याची घोषणा क्रांती सेनेचे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी केली. तसेच यातील पहिल्या ३० उमेदवारांची यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली.
चर्चगेट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपा-शिवसेनेकडून महायुतीत योग्य सन्मान दिला जात नाही. घटक पक्षांच्या बैठकीलाही या दोन मोठ्या पक्षाकडून निमंत्रित केले जात नाही. त्यामुळे महायुतीपासून फारकत घेतल्याचे सांगत विधानसभा निवडणूकीत स्वतंत्ररित्या १०० जागा लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सेनेच्यावतीने निवडणूक लढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि विविध भागातील ६० संघटनानी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच अनेक राजकिय कार्यकर्त्यांनी पक्षाच्यावतीने निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *