Breaking News

आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर स्टेज कोसळला मात्र दुखापत कोणालाही नाही

मराठी ई-बातम्या टीम

शिवजयंती उत्सवाचे निमित्त साधत चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेच्या उद्घाटन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. परंतु त्यांच्या उद्घाटनपर भाषणानंतर अचानक स्टेडवरील गर्दी वाढल्याने स्टेजच कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र या दुर्घटनेत कोणालाही इजा आणि दुखापत झाली नाही.

कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमासाठी मनसे शाखेलगत बांधण्यात आलेल्या स्टेजवरून मनसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यावेळी बोलताना म्हणाले की, शिवजयंती ही १९ तारखेला साजरी करा किंवा तिथीलाही साजरा करा. परंतु आपल्याकडे दिवाळी, गणपती, दसरा आदी सण मागच्या वर्षाची तारीख पाहिली की या वर्षी ती मागे-पुढे असते. परंतु हे सारे सण तिथीनुसार येतात. त्यामुळे शिवजयंती हा आपल्यासाठी एकप्रकारचा सणच असून तो तिथीनुसार करायला हरकत नसल्याचे सांगत ही मनसेची शाखा असून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीला विश्वास वाटला पाहिजे असे सांगत शाखा म्हणजे दुकान नव्हे असा सूचकही इशाराही मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला.

मी भाषणाला उभा नाही. मी व्यासपीठावर येण्याचे एकमेव कारण तुमचे सर्वांचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी मी व्यासपीठावर आलोय, मी काही हारतुरे घ्यायला आलेलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा शिवजंयती आपण तिथीने साजरी करतो, याचा अर्थ आज साजरी करायची असा नव्हे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जन्मदिवस, वाढदिवस हे आपले. महापुरुषांचा आणि तोही छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो सण आपण तो तिथीने साजरा करायचा. याचा अर्थ आज साजरा करायचा, असा होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी तिथीने साजरा करायचा त्यावेळी यापेक्षाही जास्त जल्लोषात शिवजयंती साजरी तुमच्याकडून झाली पाहिजे. एवढचं सांगण्यासाठी मी आज इथे आलोय असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकांना विश्वास वाटला पाहिजे की या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळेल. ही शाखा आहे दुकान नव्हे. त्यामुळे त्याचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे. एवढी फक्त मी तुम्हाला विनंती करतो. आजच्या शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद असे म्हणून त्यांनी रांगोळी काढलेल्या कलाकाराचेही कौतुक केले.

त्यानंतर स्टेजवर आलेल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेत असतानाच अचानक स्टेज खाली असलेले सपोर्ट मोडले किंवा सटकल्याने स्टेटचा काही भाग खाली बसला. त्यामुळे उपस्थितींमध्ये काही काळ घबराट पसरली. परंतु राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ राज ठाकरे यांना लगेच हात देत सावरले आणि त्यांना स्टेजवरून खाली उतरविले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत: अथवा इजा झाली नाही.

Check Also

चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाचा पदभार स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी असलेल्या स्वाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *