Breaking News

बडोलेंच्या पुढाकाराने गोदिंयातील ८३ हजार ९७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी

एक वेळ समझोता योजनेलाही ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : प्रतिनिधी

गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ८३ हजार ९४७ शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या बँक कर्ज खात्यात तब्बल २२९ कोटी ९३ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे सात बारा कोरे झाल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयातील आपल्या दालनात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

मंत्री बडोले बोलताना म्हणाले की, एकट्या गोंदिया जिल्ह्यातून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी तब्बल ८७ हजार २७६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ८३ हजार ९७४ शेतकरी पात्र ठरले आणि त्यांच्या बँक कर्ज खात्यात २२९ कोटी ९३ लाख रूपये जमा करण्यात आले. उर्वरीत ३ हजार ३०२ शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्याही बँक कर्ज खात्यात रक्कम लवकरच जमा होईल. बहुतांष शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी खास लक्ष ठेवण्यात आले.

तसेच मुद्दल व व्याजासह दिड लाख रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना अर्थात वन टाईम सेटलमेंट योजनेची मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम तातडीने भरावी असे आवाहनही त्यांनी केले.

 मात्र छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी कोणतीही अंतिम मुदत नसून शेवटच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

२८ जून २०१७ रोजी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची ९ मे २०१८ मध्ये व्याप्ती वाढवून त्यात २००८-०९ मध्ये कर्ज माफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात करण्यात आला. एवढेच नाही तर १ एप्रिल ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत वाटप केलेल्या पीक कर्ज आणि इमु पालन, पॉली हाऊस व शेडनेटच्या मध्यम मुदती कर्जाचाही समावेश केला. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळाला, हा संकटात असलेल्या शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा दिलासा असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

2 comments

  1. Thanks for finally writing about >बडोलेंच्या पुढाकाराने गोदिंयातील
    ८३ हजार ९७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी – Marathi e-Batmya <Loved it!

  1. Pingback: My Homepage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *