Breaking News

बापरे…२४ तासात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने राज्यात १०० री ओलांडली आज पुन्हा २ हजार नव्या रूग्णांचे निदान होत संख्या ५७ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी
९७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होवून २४ तासही उलटत नाहीत तोच आज राज्यातील १०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय बाब पुढे आली आहे. तसेच आजही २ हजार १९० रूग्णांचे निदान झाले असून ही संख्या ५६ हजार ९४८ अर्थात ५७ हजारवर पोहोचली असून ९६४ रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ हजार ९१८ वर पोहोचली. तर प्रत्यक्षात ३७ हजार १२५ कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.५ दिवस होता तो आज १४.७ दिवस झाला आहे. देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या ( ३२,४२,१६०) सुमारे १२. ४ टक्के तपासणी महाराष्ट्रात झाली असून दर दहा लक्ष लोकसंख्येमागे राज्यात ३१४२ जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण देशपातळीवर २३६३ एवढे आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ३१.५ % एवढे आहे. सध्या राज्यात ५,८२,७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३७,७६१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू –राज्यात १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ ,नवी मुंबई मध्ये ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबाद मध्ये ४, नाशिक ३, सोलापूरात ३, सातारा -२, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५० रुग्ण आहेत तर ४५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २,अहमदनगरचा १, नंदूरबारचा १ मृत्यू आहे.
प्रयोगशाळा तपासण्या – आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,०३,९७६ नमुन्यांपैकी ५६,९४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २६८४ झोन क्रियाशील असून आज एकूण १७,११९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६८.०६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३४०१८ १०९७
ठाणे          ५१०
ठाणे मनपा ३०४८ ६८
नवी मुंबई मनपा २२९४ ३९
कल्याण डोंबवली मनपा १०५२ १८
उल्हासनगर मनपा २१४
भिवंडी निजामपूर मनपा १००
मीरा भाईंदर मनपा ५६३ १०
पालघर १२६
१० वसई विरार मनपा ६४५ १६
११ रायगड ५०२ १२
१२ पनवेल मनपा ३९४ १३
ठाणे मंडळ एकूण ४३४६६ १२९०
१३ नाशिक १२८
१४ नाशिक मनपा १६२
१५ मालेगाव मनपा ७२२ ४७
१६ अहमदनगर ६७
१७ अहमदनगर मनपा २०
१८ धुळे २९
१९ धुळे मनपा १००
२० जळगाव ३६५ ४६
२१ जळगाव मनपा १४०
२२ नंदूरबार ३२
नाशिक मंडळ एकूण १७६५ १२१
२३ पुणे ४१०
२४ पुणे मनपा ५८३० २७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३७४
२६ सोलापूर २७
२७ सोलापूर मनपा ६५२ ५०
२८ सातारा ३९५
पुणे मंडळ एकूण ७६८८ ३५०
२९ कोल्हापूर ३१८
३० कोल्हापूर मनपा २८
३१ सांगली ८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १९
३४ रत्नागिरी १९२
कोल्हापूर मंडळ एकूण ६५१
३५ औरंगाबाद २६
३६ औरंगाबाद मनपा १३०९ ५६
३७ जालना ७९
३८ हिंगोली १३३
३९ परभणी १९
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १५७२ ५८
४१ लातूर ८५
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ४५
४४ बीड ४०
४५ नांदेड १९
४६ नांदेड मनपा ८६
लातूर मंडळ एकूण २८४
४७ अकोला ३९
४८ अकोला मनपा ४४८ १८
४९ अमरावती १६
५० अमरावती मनपा १७८ १२
५१ यवतमाळ ११५
५२ बुलढाणा ५३
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ८५७ ४०
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४७५
५६ वर्धा १०
५७ भंडारा १९
५८ गोंदिया ४८
५९ चंद्रपूर १६
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली २६
नागपूर एकूण ६१२ १०
इतर राज्ये /देश ५३ १३
एकूण ५६९४८ १८९७

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *