Breaking News

कोरोना: १ लाख ७ हजारापैकी ५० हजाराहून अधिक रूग्ण घरी आज पुन्हा ३ हजार ३९० रूग्णांचे निदान तर १२० जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात एकाबाजूला कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून आज ३ हजार ३९० नव्या रूग्णांचे निदान तर १२० जणांचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या बाजूला १६३२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ५० हजार ९७८ वर पोहोचली असल्याने १ लाख ७ हजार ९५८ रूग्णांपैकी ५३ हजार रूग्ण हे अॅक्टीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यास साधारणत: २१ एप्रिलपासून सुरुवात झाली. मात्र मे महिन्याच्या मध्यावर एकाच दिवशी १८ हजार रूग्ण बरे होवून त्यांना घरी सोडण्यात आले. तेव्हापासून कधी १ हजार तर कधी २००० रूग्ण बरे होत त्यांची संख्या ५० हजार ९७८ वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय राज्यातील एकूण मृतकांची संख्या ४ हजाराच्या घरात पोहोचली असून ही संख्या ३ हजार ९५० वर पोहोचली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४७.२ %एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.६५ %. सध्या राज्यात ५,८७,५९६ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात१५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७,१८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९,६४१लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू–राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ८० मुंबई -६९,ठाणे -४,उल्हासनगर – ५, पालघर – १ , वसई विरार – १
पुणे १४ पुणे  -११, सोलापूर -३.
नाशिक १४ नाशिक – ३, जळगाव – ११
कोल्हापूर रत्नागिरी -१
औरंगाबाद औरंगाबाद – ७
लातूर उस्मानाबाद -२
अकोला अकोला-२

 

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ५८२२६ २६९८६ २१८२ २९०५०
ठाणे १८०८० ६८७१ ४३४ १०७७४
पालघर २३२६ ७१४ ५० १५६२
रायगड १८६८ ११६३ ६४ ६३९
नाशिक १९३४ ११७८ १०५ ६५१
अहमदनगर २३९ १६६ ६४
धुळे ३९३ २२३ २६ १४३
जळगाव १७०२ ६६८ १३१ ९०३
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४८ ३० १४
१० पुणे १२१८४ ६७५० ४८० ४९५४
११ सोलापूर १८२० ६७६ १३१ १०१३
१२ सातारा ७४१ ४३६ २८ २७७
१३ कोल्हापूर ६९४ ५३२ १५४
१४ सांगली २२५ १२० ९८
१५ सिंधुदुर्ग १५० ७८ ७२
१६ रत्नागिरी ३९२ २७६ १६ १००
१७ औरंगाबाद २६६८ १४५५ १३५ १०७८
१८ जालना २७२ १५९ १०७
१९ हिंगोली २३९ १८७ ५१
२० परभणी ८२ ६९ १०
२१ लातूर १७६ १२० ४८
२२ उस्मानाबाद १४६ ११३ २८
२३ बीड ७५ ४९ २४
२४ नांदेड २३५ १५१ १० ७४
२५ अकोला १०२१ ५६८ ४२ ४१०
२६ अमरावती ३४४ २४३ २१ ८०
२७ यवतमाळ १८१ १३६ ४२
२८ बुलढाणा १२५ ७३ ४९
२९ वाशिम ४९ ४१
३० नागपूर १०१३ ५९८ १२ ४०३
३१ वर्धा १४
३२ भंडारा ४९ ४१
३३ गोंदिया ७० ६९
३४ चंद्रपूर ४७ २७ २०
३५ गडचिरोली ४९ ३९
इतर राज्ये /देश ८१ २० ६१
एकूण १०७९५८ ५०९७८ ३९५० १३ ५३०१७

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

One comment

  1. प्रकाश पाठक

    प्रथमच कोरोना qurantine झालेल्यांची संख्या कळली. भितीदायक आहे.
    धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *